नाशिकमधील खैरनार वस्तीवर सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांच्या मारहाणीत एक दाम्पत्य गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 12:44 PM2017-10-30T12:44:53+5:302017-10-30T12:46:30+5:30
बागलाण तालुक्यातील दसाणे येथील खैरनार वस्तीवर टाकलेल्या सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या दरोड्यात तीन लाख रुपयांच्या रोकडसहीत 9 लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे
सटाणा (नाशिक) : बागलाण तालुक्यातील दसाणे येथील खैरनार वस्तीवर टाकलेल्या सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या दरोड्यात तीन लाख रुपयांच्या रोकडसहीत 9 लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे. दरम्यान, दरोडेखोरांनी देवचंद खैरनार (वय 54 वर्ष), सुशीला खैरनार (वय 50 वर्ष) या दाम्पत्याला जबर मारहाण करून गंभीर जखमी केले.
यावेळी दरोडेखोरांनी या दाम्पत्याचे हातपाय बांधून वस्तीवर दोन तास धुमाकूळ घातला. दरम्यान,खैरनार दाम्पत्यानं आरडाओरडा करू नये, यासाठी त्यांच्या तोंडात बोळे घातल्यामुळे शेजा-यांनाही याबाबतची माहिती सोमवारी (30ऑक्टोबर) सकाळी समजली. यानंतर तातडीनं जखमी खैरनार दाम्पत्याला उपचारासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान घटनास्थळी मालेगाव ग्रामीणचे पोलीस उप-अधीक्षक शशिकांत शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. सात दरोडेखोर अहिराणी भाषिक असल्यामुळे पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.