प्रचाराच्या वादातून कार्यालयावर दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 02:00 AM2019-10-17T02:00:11+5:302019-10-17T02:02:02+5:30
वडाळारोडवरील काजीनगर भागात नसीम व्हिला नावाच्या सोसायटीत असलेल्या तन्वीर जब्बार खान यांच्या कार्यालयात सुमारे पंचवीस इसमांनी बळजबरीने घुसून त्यांना ‘फरांदे यांचे काम का करतो’ असा प्रश्न करत मारहाण करून टेबलावरील रोकड, दागिने अशी एकूण ४ लाख ९० हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडल्याची तक्रार पोलीसात करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी दहा संशयित व त्यांच्या साथीदारांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक : वडाळारोडवरील काजीनगर भागात नसीम व्हिला नावाच्या सोसायटीत असलेल्या तन्वीर जब्बार खान यांच्या कार्यालयात सुमारे पंचवीस इसमांनी बळजबरीने घुसून त्यांना ‘फरांदे यांचे काम का करतो’ असा प्रश्न करत मारहाण करून टेबलावरील रोकड, दागिने अशी एकूण ४ लाख ९० हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडल्याची तक्रार पोलीसात करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी दहा संशयित व त्यांच्या साथीदारांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, काजीनगरमधील खान यांच्या कार्यालयवजा घरात बळजबरीने शिरून टोळक्याने त्यांना मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत संशयित युनूस तांबोळी, फारूख तांबोळी, इमरान तांबोळी, एजाज तांबोळी, रिजवान तांबोळी, शकील तांबोळी, दानिश तांबोळी, इकबाल तांबोळी, इरफान तांबोळी, लड्या तांबोळी यांच्यासह वीस ते पंचवीस इसमांनी बळजबरीने प्रवेश के ला. ‘तू फरांदेबाई यांचे काम कशाला करतो’ असा दम भरत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या झटापटीत टेबलावरील रोकड, दागिने असा एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज हिसकावून टोळक्याने पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी संशयित दहा हल्लेखोर व त्यांच्या अन्य साथीदारांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.