ऑक्सिजन असलेल्या खासगी रूग्णवाहिकांकडून लूट; अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:14 AM2021-04-21T04:14:39+5:302021-04-21T04:14:39+5:30

गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक रूग्णवाहिका चालकांनी माणुसकीचा धर्म म्हणून आपली सेवा मोफत उपलब्ध करून दिली होती. मात्र ...

Robbery from private ambulances with oxygen; Ava's Savva rent levy | ऑक्सिजन असलेल्या खासगी रूग्णवाहिकांकडून लूट; अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी

ऑक्सिजन असलेल्या खासगी रूग्णवाहिकांकडून लूट; अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी

googlenewsNext

गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक रूग्णवाहिका चालकांनी माणुसकीचा धर्म म्हणून आपली सेवा मोफत उपलब्ध करून दिली होती. मात्र यंदा आता त्याची जागा धंद्याने घेतली असून, शासकीय व खासगी रूग्णालयांच्या बाहेर या रूग्णवाहिका उभ्या करून सावज हेरले जात आहे. रूग्ण व त्याच्या नातेवाईकांची असहाय्यता लक्षात घेऊन मनात येईल त्या दराने रूग्णवाहिका भाडे आकारत आहेत.

----------

अशी आहे रूग्णवाहिकेची आकडेवारी

११२ ऑक्सिजन असलेल्या

११२ शासकीय रूग्णवाहिका

-----

१३२ ऑक्सिजन असलेल्या

२२३ खासगी रूग्णवाहिका

----------------

बिटको रूग्णालय

नाशिक रोडच्या बिटको रूग्णालयापासून मुंबई नाका येथे रूग्णाची ने-आण करण्यासाठी खासगी रूग्णवाहिका चालकाकडून तीन हजार रूपयांची भाडे आकारणी करण्यात आली. मुळात हे अंतर दहा किलोमीटरचे असून, प्रती किलोमीटर तीनशे रूपये या दराने ही आकारणी करण्यात आली.

-----

त्रिमूर्ती चौक

सिडकोतील त्रिमूर्ती चौकातून एका रूग्णाला त्रास होऊ लागल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयात पोहोचविण्यासाठी रूग्णवाहिका चालकाने अडीच हजार रूपयांची आकारणी केली. या दोन्ही ठिकाणाचे अंतर अवघे साडेचार किलोमीटर इतके आहे.

------------

गंगापूर रोड

गंगापूर रोडवर अनेक खासगी रूग्णालये असून, यातील बहुतांशी रूग्णालये अगदीच जवळजवळ आहेत. तरी देखील रूग्णवाहिकांची भाडे आकारणी कमी झालेली नाही. काही खासगी रूग्णालयांची स्वत:ची रूग्णवाहिका असून, त्यांनी देखील दराबाबत निश्चिती केलेली नाही.

--------------

तक्रार कुठे करायची ?

१ रूग्णवाहिकांच्या मनमानी दर आकारणीबाबत गेल्या वर्षी प्रशासनाने आरटीओ व वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती गठित केली.

२ या समितीने किलोमीटर प्रमाणे रूग्णवाहिकांनी किती दर आकारणी करावी याबाबत दर आकारणी ठरवून दिली होती.

३ रूग्णवाहिका चालकांकडून मनमानीपणे दर आकारणी केली जात असेल तर त्याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रारीची सोय करण्यात आली आहे.

-----------

Web Title: Robbery from private ambulances with oxygen; Ava's Savva rent levy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.