तोतया पोलिसांकडून इंदिरानगरमध्ये लूट

By admin | Published: November 22, 2015 10:58 PM2015-11-22T22:58:41+5:302015-11-22T23:00:07+5:30

तोतया पोलिसांकडून इंदिरानगरमध्ये लूट

The robbery robbed the police from Indiranagar | तोतया पोलिसांकडून इंदिरानगरमध्ये लूट

तोतया पोलिसांकडून इंदिरानगरमध्ये लूट

Next

इंदिरानगर : ‘आम्ही पोलीस आहोत, पुढे जाऊ नका’, ‘तुमच्याजवळील मौल्यवान साहित्य पिशवीत काढून रुमालात बांधून आमच्याकडे द्या’, असे सांगत तोतया पोलिसांनी साठ हजार रुपये किमतीची तीन तोळे वजनाची सोन्याची साखळी लुटल्याची घटना इंदिरानगर परिसरात उघडकीस आली आहे. चांगदेव तुषार शिंदे (वय ५५, रा. पाटील गार्डन, इंदिरानगर) हे शनिवारी सकाळी साडेदहा वाजता मर्चंट बँकेजवळून पायी जात होते. यावेळी दोन संशयित पल्सर मोटारसायकलवर आले. त्यांनी शिंदे यांच्याशी संवाद साधत भीती निर्माण करणारी माहिती दिली. यामुळे त्यांनी रु माल काढून त्यात गळ्यातील तीन तोळ्याच्या सोनसाखळीसह खिशातील भ्रमणध्वनी, रोख रक्कम ठेवून संशयिताकडे दिली. काही वेळाने संशयितांनी हातचलाखीने हा ऐवज घेत तो रु माल त्यांच्या पिशवीत टाकून दिला. घरी गेल्यावर शिंदे यांच्या सदर बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून संशयित लबाडांविरुद्ध तक्र ार दाखल केली आहे.
लग्नास नकार दिल्याने
तरुणीस मारहाण
इंदिरानगर : मुलीने लग्नाची मागणी फेटाळल्याचा राग धरून संशयिताने मुलीस शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना इंदिरानगर परिसरात घडली. संशयित विशाल उर्फहरिश्चंद्र विजय मथुरे (रा. इंदिरानगर) याने एका मुलीला विवाह करण्याची मागणी घातली होती; मात्र मुलीने नकार दिल्याने मथुरे यांनी मनात राग धरून संबंधित मुलीचे आई-वडील व भाऊ यांना मारण्याची धमकी देत मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इसमाची आत्महत्त्या
नाशिक : राहत्या घरी गळफास घेऊन इसमाने आत्महत्त्या केल्याची घटना सिडको येथे घडली. हेमराज बळीराम सपकाळे (वय ४२, रा. सप्तशृंगी चौक, पवननगर) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: The robbery robbed the police from Indiranagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.