मुलाच्या गळ्यास चाकू लावून महिलेच्या दागिन्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:13 AM2021-03-20T04:13:45+5:302021-03-20T04:13:45+5:30

इंदिरानगर : भागात कैलासनगर परिसरात चौघा अज्ञात चोरट्यांनी एका घरात भरदिवसा प्रवेश करीत बालकाच्या गळ्याला चाकू लावून आईच्या ...

Robbery of a woman's jewelry by stabbing a child in the neck | मुलाच्या गळ्यास चाकू लावून महिलेच्या दागिन्यांची लूट

मुलाच्या गळ्यास चाकू लावून महिलेच्या दागिन्यांची लूट

Next

इंदिरानगर : भागात कैलासनगर परिसरात चौघा अज्ञात चोरट्यांनी एका घरात भरदिवसा प्रवेश करीत बालकाच्या गळ्याला चाकू लावून आईच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम असा एकूण ३६ हजार रुपयांचा ऐवज लुटण्याचा प्रकार घडला आहे. भरदिवसा अशाप्रकारे दरोड्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून चोरट्यांनी पोलिसांसमोर आ‌व्हान निर्माण केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललिता मरसाळ ( २८, रा. कैलास नगर, जय मल्हार नगर )यांचे पती प्रदीप गुरुवारी (दि, १८) रोजी प्रदीप मरसाळ कामानिमित्त सकाळी दहा वाजता पुण्याला निघून गेले होेते. याच दिवशी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ललिता मरसाळ जेवण करत असताना त्यांचा मुलगा भावेश (१०) झोपला होता. यावेळी ४ अनोळखी तरुणांनी त्यांच्या घरात प्रवेश करीत आतून घराचा दरवाजा बंद करीत मरसाळ यांच्याकडे त्याच्याजवळ असलेले सोने व पैशांसह मोबाइलची जबरदस्तीने मागणी केली. या दरम्यान, त्यांचा मुलगा भावेश झोपेतून जागा झाल्याने चौघा चोरट्यांपैकी एकाने धारदार चाकू भावेशच्या गळ्याला लावत मरसाळ यांचेकडे अंगावरील दागिन्यांची मागणी केली. दागिने दिले नाही तर मुलाला मारण्याची धमकी दिली, त्यामुळे ललिता मरसाळ यांनी घाबरून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील टापसे व उजव्या कानातील कुडक असे दागिने काढून चोरट्यांच्या स्वाधीने केले. याच दरम्यान चौरट्यांपैकी एकाने घरातील वस्तू अस्तव्यस्त करून तपासणी करीत पर्समधील रोख दहा हजार रुपये काढून घेतले. घराच चोरट्यांचा धुडगूस सुरू असतानाच बाहेरून कोणी येण्याची चाहूल लागताच चारही चोरट्यांनी हाती लागलेले सोन्याचे दागिने व रोख दहा हजार असे एकूण सुमारे ३६ हजार रुपयांचा ऐवज लुटून दुचाकीवरून पळ काढला. चोरटे घराबाहेर पडताच ललिता मरसाळ यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: Robbery of a woman's jewelry by stabbing a child in the neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.