राजापूर येथे विद्युत खांबावरील रोहित्र चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 05:12 PM2018-12-17T17:12:46+5:302018-12-17T17:13:49+5:30

राजापूर : येवला तालूकातील राजापूर येथे टान्सफामॅर (डि.पी.) चोरीला गेल्याने राजापूर व परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. राजापूर येथील संतोष भाबड यांच्या शेतातील गट नंबर २६६ मध्ये पंचवीस हॉर्सपॉवरची डि. पी. अज्ञात चोरांनी चोरली. पोलावरील डि. पी. चोरीचा हा प्रकार रविवार (दि.१६) रात्री घडला.

Robot robbery at Rajapur | राजापूर येथे विद्युत खांबावरील रोहित्र चोरीला

राजापूर येथे विद्युत खांबावरील रोहित्र चोरीला

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये घबराट : शोध मोहिम सुरु पोलिसांपुढे आव्हान

राजापूर : येवला तालूकातील राजापूर येथे टान्सफामॅर (डि.पी.) चोरीला गेल्याने राजापूर व परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. राजापूर येथील संतोष भाबड यांच्या शेतातील गट नंबर २६६ मध्ये पंचवीस हॉर्सपॉवरची डि. पी. अज्ञात चोरांनी चोरली. पोलावरील डि. पी. चोरीचा हा प्रकार रविवार (दि.१६) रात्री घडला.
चोरांनी डिपीतील कॉपरची कायल व आॅईल हे सगळे चोरांनी चोरून नेले आहे. सकाळी संतोष भाबड हे शेतातील पाणी पिण्यासाठी मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांना हा प्रकार घडल्याचे लक्षात आले. त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना कळविले.
येवला तालुका वीज वितरण कंपनीचे अधिकारी पाटील हे येवला तालुका पोलिस स्टेशनला तक्र ार दाखल करणार असल्याची माहिती आहे. राजापूर येथे या प्रकारामुळे वाड्या, वस्तीवरील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डि.पी.ची चोरी करताना बराच वेळ गेला असेल असे शेतकरी वर्गात चर्चा आहे. मागे काही दिवसांपूर्वी कोळगाव बंधारा येथे असा प्रकार घडला होता. त्यात राजापूर व परिसरात दूष्काळ परिस्थिती असल्याने विहीर व बोअरवेल हे कोरडे पडले आहे. त्यामुळे मोटार चालू करण्याची गरजच पडत नाही. काही विहीराना साठवून ठेवलेले पाणी आहे ते फक्त पाच ते दहा मिनीटे चालू करावी लागतात त्यामुळे राजापूर येथे मागे काही दिवसांपूर्वी छोट्या- मोठ्या चोºया झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी गावासाठी गस्त घालावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वीज वितरण कंपनीने या प्रकाराला आळा बसेल अशा उपाययोजना व अज्ञात चोराचा शोध घेवून कारवाई करावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
 
Web Title: Robot robbery at Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.