आज होणार ‘रॉकेट मोटार’ची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:13 AM2020-12-25T04:13:36+5:302020-12-25T04:13:36+5:30

लॉकडाऊन काळातसुध्दा अशाप्रकारे सुपरसॉनिक विमानांच्या चाचणीप्रसंगी शहरात सर्वत्र सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास स्फोटसदृश आवाज ऐकू आला होता. ...

Rocket Motor to be tested today | आज होणार ‘रॉकेट मोटार’ची चाचणी

आज होणार ‘रॉकेट मोटार’ची चाचणी

Next

लॉकडाऊन काळातसुध्दा अशाप्रकारे सुपरसॉनिक विमानांच्या चाचणीप्रसंगी शहरात सर्वत्र सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास स्फोटसदृश आवाज ऐकू आला होता. या आवाजाने नाशिककर हादरुन गेले होते आणि दिवसभर नाशिककरांच्या सोशल मीडियावर याप्रकरणी चर्चा रंगली होती. तसेच या आवाजाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी बहुतांशी नाशिककरांनी पोलीस नियंत्रण कक्षासह जिल्हाधिकारी कार्यालयात दूरध्वनीवर संपर्क साधला होता. याबाबत उशिरा आपत्ती व्यवस्थापनाकडून एचएएलच्या लढाऊ विमानांच्या चाचणीप्रसंगी निर्माण झालेल्या हवेतील सुपरसॉनिक ध्वनिलहरींमुळे आवाज नाशिककरांच्या कानी पडल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

दरम्यान, नागरिकांचा संभ्रम होऊ नये आणि भीती दाटून येऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ओझर येथील डीआरडीओच्या अेसीईएम सेंटरकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला पत्राद्वारे पुर्वसुचना म्हणून सोमवारी (दि.२१) लेखी पत्राद्वारे दिली. यानुसार आपत्ती व्यवस्थापनाकडून गुरुवारी (दि.२४) प्रसिध्दीपत्रकान्वये नागरिकांना रॉकेट मोटार चाचणीसंदर्भात पुर्वसुचना देण्यात आली. चाचणी क्षेत्रातील जवळच्या लोकवस्तीमधील रहिवाश्यांनी घाबरुन जाण्याचे काहीही कारण नाही या ध्वनीचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचे पत्रकात म्हटले आहे. ध्वनीची पातळी १८० डेसिबल इतकी राहणार असल्याचे ओझर येथील ‘अेसीईएम’कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Rocket Motor to be tested today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.