शहरात ठिकठिकाणी रोडरोमिओचे कट्टे; घराबाहेर पडलेली मुलगी सुरक्षित किती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:18 AM2021-09-16T04:18:46+5:302021-09-16T04:18:46+5:30
--- या ठिकाणचे रोडरोमिओ पोलिसांना दिसत नाहीत का? बसस्थानके : शहरातील मुख्य बसस्थानकांच्या आवारासह शहरांतर्गत असलेले काही बसथांब्यांवर दिवसा ...
---
या ठिकाणचे रोडरोमिओ पोलिसांना दिसत नाहीत का?
बसस्थानके :
शहरातील मुख्य बसस्थानकांच्या आवारासह शहरांतर्गत असलेले काही बसथांब्यांवर दिवसा तसचे संध्याकाळच्या वेळेस रोडरोमिओंचे कट्टे गजबजलेले असतात. महिला, मुलींना बघून शेरेबाजी करणे तसेच अश्लील हाव भाव करण्यापर्यंत या मंडळीची मजल जात असल्याच्या तक्रारी आहेत.
---इन्फो--
निर्भया पथके आहेत कुठे?
शहरात महिला, मुलींची छेडछाड रोखण्यासाठी आणि टवाळखोरांना धडा शिकविण्यासाठी गठित करण्यात आलेली निर्भया पथके अचानकपणे गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांना येऊ लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ही पथके जणू हरविली की काय? अशी शंका येऊ लागली आहे. साध्या वेशात महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असणारी ही स्वतंत्र पथके टवाळखोर, रोडरोमिओंवर नजर ठेवून असायची. यामुळे अशा टारगट प्रवृत्तीच्या तरुणांवर पोलिसांचा धाक निर्माण झाला होता.
--
कॉलेजरोड :
कोरोनामुळे महाविद्यालये बंद जरी असली तरीदेखील कॉलेजरोड परिसरातील काही चौकांमध्ये टवाळखोरांसह रोडरोमिओंचे कट्टे गजबजलेले पहावयास मिळतात. खरेदीसाठी येणाऱ्या महिला, तरुणींचा पाठलाग करत बळजबरीने संवाद साधण्याचा प्रयत्न करणे, शेरेबाजी करणे यासारखे प्रकार कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरातील विविध चहा स्टॉल्स, कॅफेच्या परिसरात सर्रास घडतात.
---
कोणी छेड काढत असेल तर येथे संपर्क करा :
शहर व परिसरात कोठेही जर महिला, तरुणींची कोणी छेड काढण्याचा प्रयत्न करत असेल तर संबंधितांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाच्या (०२५३-२३०५२३३/३४) तसेच (१००) क्रमांकावर संपर्क साधावा, पोलीस मदत तत्काळ उपलब्ध करून दिली जाईल, असा आयुक्तालयाचा दावा आहे.