रोहयोच्या मजुरीत फक्त २ रुपये वाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 03:05 PM2018-04-17T15:05:53+5:302018-04-17T15:05:53+5:30
१ एप्रिलपासून शासनाने ही वाढ लागू केली असून, यापूर्वी अकुशल कामगारांना २०१ रुपये इतकी मजुरी मिळत होती. मजुरीत वाढ करण्यामागे ठोस असे कारण नसले तरी, दरवर्षी शासन एप्रिल महिन्यात तशी वाढ करीत असल्याचे सांगण्यात आले. मुळात रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्वी केल्या जात असलेल्या रस्ते
नाशिक : जीवनावश्यक वस्तूंची कमालीची भाववाढ, महागाईने गाठलेला कळस, इंधन दरवाढीत होणारी होरपळ लक्षात घेता सर्वत्र सरकारविरुद्ध असंतोष व्यक्त केला जात असताना राज्य सरकारने महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम करणाऱ्या अकुशल कामगारांच्या मजुरीत फक्त २ रुपयांनी वाढ करून मजुरांची थट्टा केल्याची भावना व्यक्त केली जात आहे. रोहयोच्या मजुरीत वाढ करण्यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आलेला असताना गेल्या वर्षाच्या तुलनेत फक्त २ रुपये वाढ झाल्याने आता मजुरांना दररोज २०३ रुपये मजुरी मिळणार आहे.
१ एप्रिलपासून शासनाने ही वाढ लागू केली असून, यापूर्वी अकुशल कामगारांना २०१ रुपये इतकी मजुरी मिळत होती. मजुरीत वाढ करण्यामागे ठोस असे कारण नसले तरी, दरवर्षी शासन एप्रिल महिन्यात तशी वाढ करीत असल्याचे सांगण्यात आले. मुळात रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्वी केल्या जात असलेल्या रस्ते, तलाव, बंधारे, जमीन सपाटीकरण आदी कामे केली जात होती व गावातील मजुरांना गावातच रोजगार निर्मिती करण्यासाठी ही योजना महाराष्टÑात यशस्वी ठरली होती. मजुरीच्या मोबदल्यात मजुरांना अन्नधान्य देण्याचीदेखील तरतूद यात करण्यात आली होती. ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी यशस्वी ठरलेली ही योजना केंद्र सरकारने स्वीकारून संपूर्ण देशपातळीवर ती लागू केली असून, अनेक मागास राज्यांनी या योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे करून घेतली आहेत. परंतु महाराष्टÑातील विदर्भाचा काही भाग सोडल्यास रोहयोच्या कामांकडे मजुरांनी पाठ फिरविली आहे. दिवसभर काम करून रोहयोतून मिळणाºया मजुरीतून दोन वेळचे पोट भरत नसल्याची वाढत चाललेली भावना व त्यामानाने मोलमजुरीत तसेच शेतीकामात मिळणारी मजुरी अधिक असल्यामुळे रोहयोच्या कामांमध्ये मजुरांअभावी कमालीची घट झाली. परिणामी घरकुल योजना, शौचालय व विहीर बांधकाम अशी व्यक्तिगत लाभाच्या योजनांसाठीच मजूर कामे करू लागले आहेत. महागाईच्या तुलनेत रोहयो मजुरांना मिळणाºया मजुरीचा विचार करता राज्य सरकारच्या रोजगार हमी योजना समितीने सन २०१४-१५ मध्ये मजुरांना किमान ३०० रुपये मजुरी मिळावी, अशी शिफारस केली होती. परंतु सरकारने या शिफारशीकडे दुर्लक्ष करून सन २०१७-१८ मध्ये २०१ रुपये व आता २०१८-१९ मध्ये २०३ रुपये मजुरीत वाढ केली आहे. सरकारची ही कृती म्हणजे मजुरांची थट्टाच असल्याची टीका केली जात आहे.