बचतगटाच्या महिलांना ‘रोहयो’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 12:18 AM2020-05-30T00:18:02+5:302020-05-30T00:19:01+5:30

कोरोनामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पुरती कोलमडून पडली असून, खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतमजुरांच्याही हाताला काम राहिलेले नसल्याने हाता-तोंडाची गाठ कशी बांधावी, असा प्रश्न निर्माण झालेला असताना जिल्हा परिषदेने महिला बचतगटांना महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या कामात येवला तालुक्याने मोठी मजल मारली असून, सहा ग्रामपंचायतींनी बचत गटातील जवळपास दोनशे ते तीनशे महिलांच्या हाताला गेल्या काही दिवसांपासून काम दिले आहे.

Rohyo support for self-help group women | बचतगटाच्या महिलांना ‘रोहयो’चा आधार

बचतगटाच्या महिलांना ‘रोहयो’चा आधार

Next
ठळक मुद्देशेकडो हातांना काम : राज्यात नाशिक पॅटर्न चर्चेत

नाशिक : कोरोनामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पुरती कोलमडून पडली असून, खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतमजुरांच्याही हाताला काम राहिलेले नसल्याने हाता-तोंडाची गाठ कशी बांधावी, असा प्रश्न निर्माण झालेला असताना जिल्हा परिषदेने महिला बचतगटांना महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या कामात येवला तालुक्याने मोठी मजल मारली असून, सहा ग्रामपंचायतींनी बचत गटातील जवळपास दोनशे ते तीनशे महिलांच्या हाताला गेल्या काही दिवसांपासून काम दिले आहे.
कोरोनाचा फटका गावोगावच्या महिला बचतगटांनाही बसला असून, त्यांच्याकरवी तयार केल्या जात असलेल्या गृहोपयोगी वस्तूंनाही मागणी नसल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत बचत गटाच्या महिलांना आठवड्याकाठी भरावे लागणारे बचत गटाचे शुल्क कोठून आणावे? असा प्रश्न निर्माण झाला असून, काही महिलांनी बचतगटांकडून कर्ज घेतलेले असल्याने त्यांनाही कर्ज फेडायची चिंता वाटू लागली आहे. या सर्व बाबींची विचार करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजना व महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाची सांगड घालून महिलांना बचत गटांच्या माध्यमातून रोहयोचे काम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्याने त्याची सुरुवात येवला तालुक्यापासून करण्यात आली आहे.
गावोगावच्या ग्रामपंचायतींनी आपल्या गावातील महिला बचत गटांना या योजनेविषयी अवगत केल्यानंतर येवला तालुक्यातील पाटोदा, शिरसगाव लौकी, पारेगाव, चिंचोडी, रायते, अंगुलगाव, नांदूर या गावातील बचत गटातील महिलांना रोहयोच्या कामासाठी पुढाकार दर्शवून आपल्या बचतगटाची नोंद ग्रामपंचायतीच्या कामासाठी केली आहे. सध्या या सहाही गावामध्ये रोहयोच्या समूह गटाच्या कामासाठी महिला बचत गटाने सुरुवात केली असून, गावातील तलावाचे काम काढण्याचे अकुशल कामे त्यांच्याकडून करवून घेतली जात आहेत.
या कामासाठी दररोज या महिलांसाठी गाळ काढण्यासाठीचे मार्किंग करून दिले जात असून, दिवसभरातून त्यांनी किती कामकाज केले त्याचे सायंकाळी मोजमाप केले जाते. त्या कामाच्या प्रमाणात त्यांना त्याचा मेहनताना अदा केला जात आहे.
रोहयोच्या कामासाठी प्रत्येकी २२७ रुपये मेहनताना शासनाने निश्चित केलेला असला तरी, महिलांच्या कार्यक्षमतेवर त्यापेक्षाही अधिक शुल्काचे काम करून महिलांकडून तीनशे ते चारशे रुपयांचे काम केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असलेल्या या कामासाठी सुरक्षित अंतर ठेवण्याचे, तोंडाला मास्क वापरण्याचे त्याचबरोबर काम आटोपल्यानंतर हात स्वच्छ धुण्याची व्यवस्थाही केली जात आहे.
जॉबकार्ड तयार करण्याचे काम सुरू
ग्रामीण भागातील महिलांना रोहयोतून काम मिळू लागल्याचे पाहून येवला तालुक्यातील महिला बचतगटाच्या सुमारे चारशे ते पाचशे महिलांनी रोहयोच्या कामासाठी आपली नोंदणी केली असून, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून त्यांचे जॉबकार्ड तयार करण्याचे काम केले जात असल्याची माहिती तालुका समन्वयक दीपिका जैन यांनी दिली आहे, तर महिला बचतगटातील महिलांना अधिकाधिक कामे देण्यासाठी गटविकास अधिकारी उमेश देशमुख प्रयत्नशील आहेत.

Web Title: Rohyo support for self-help group women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.