राज ठाकरेंची भूमिका कोणाच्या पथ्यावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 01:21 AM2019-03-20T01:21:53+5:302019-03-20T01:22:23+5:30

२००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांंकाची मत, नाशिक महापालिकेत तब्बल ४० नगरसेवक निवडून आणण्याची साधलेली किमया आणि १० वर्षांपूर्वी शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघ काबीज करणाऱ्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे अध्यक्ष अमित शहा या दोघांच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

Role of Raj Thackeray on whose path? | राज ठाकरेंची भूमिका कोणाच्या पथ्यावर?

राज ठाकरेंची भूमिका कोणाच्या पथ्यावर?

Next
ठळक मुद्देराजकीय भूमिका गुलदस्त्यातच

नाशिक : २००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांंकाची मत, नाशिक महापालिकेत तब्बल ४० नगरसेवक निवडून आणण्याची साधलेली किमया आणि १० वर्षांपूर्वी शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघ काबीज करणाऱ्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे अध्यक्ष अमित शहा या दोघांच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. मात्र लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस आघाडीसह अन्य पक्षांचे उमेदवारही रिंगणात उतरणार असल्याने ठाकरे यांनी घेतलेली भाजपाविरोधी भूमिका नेमकी कोणाच्या पथ्यावर पडेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या निवडणुकीत युती, आघाडीसह माकपा, भाकपा, बहुजन वंचित आघाडी, बसपा, सपा, आम आदमी पार्टीनेही उमेदवार रिंगणात उतरविण्याचे ठरविले आहे. मंगळवारी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ‘मोदी-शहा यांना दूर सारा’, असा संदेश दिला. परंतु राजकीय भूमिका गुलदस्त्यात ठेवली.
भाजपाचा पराभव करा असे सांगत असताना कोणाला मतदान करायचे हे मात्र त्यांनी जाहीर केले नाही. त्यामुळे मनसेच्या मतांविषयी जो तो आपल्या परीने अर्थ लावण्यास मोकळा झाला आहे. नाशिक हा एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला होता.
मात्र कालांतराने मनसेत मोठी पडझड होऊन विधानसभा, महापालिका निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला. अशा परिस्थितीत ठाकरे यांनी भाजपा विरोध दर्शविताना नेमकी मदत कुणाला करावी, याविषयी भूमिका स्पष्ट न केल्याने मनसैनिक संभ्रमात पडले आहेत. तरीही ठाकरे यांनी राजकीय फटाके फोडण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त अजून शिल्लक ठेवल्याने तोपर्यंत मनसैनिकांसह भाजपाविरोधी पक्षांनाही प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मनसे लोकसभा निवडणूक लढविणार नाही हे यापूर्वीच राज ठाकरे यांनी जाहीर केले होते, परंतु ते कोणाला मदत करतात याविषयी वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. मध्यंतरी त्यांची राष्टÑवादीच्या नेत्यांशी झालेली जवळीकता पाहता, ठाकरे हे राष्टÑवादीच्या उमेदवारांना मदत करतील, अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेकडे साºया पक्षांचे लक्ष लागून होते.

Web Title: Role of Raj Thackeray on whose path?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.