राष्टÑाची जडणघडण करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:25 PM2020-01-20T22:25:33+5:302020-01-21T00:20:46+5:30

बालकांवर संस्कार करणे ही शिक्षक आणि पालकांची जबाबदारी आहे. राष्ट्राची जडणघडण करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षक ज्या पद्धतीने विद्यार्थी घडवतो त्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठाचे नितीन मोरे यांनी केले.

The role of teachers is important in shaping the nation | राष्टÑाची जडणघडण करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची

निफाड येथील वैनतेय विद्यालयात मार्गदर्शन करताना नितीन मोरे. समवेत वि. दा. व्यवहारे, रतन पाटील वडघुले.

googlenewsNext
ठळक मुद्देनितीन मोरे : वैनतेय विद्यालयात ज्ञानाचा उत्सव

निफाड : बालकांवर संस्कार करणे ही शिक्षक आणि पालकांची जबाबदारी आहे. राष्ट्राची जडणघडण करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षक ज्या पद्धतीने विद्यार्थी घडवतो त्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठाचे नितीन मोरे यांनी केले.
निफाड येथील न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळ संचलित वैनतेय विद्यालयात न्या. रानडे जयंती महोत्सवांतर्गत ज्ञानाचा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्र मात ‘बालसंस्कार काळाची गरज’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना मोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे सचिव रतन पाटील वडघुले होते. व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त वि. दा. व्यवहारे उपस्थित होते. मोरे म्हणाले की, भारतात ३० कोटी युवक आहेत; परंतु या देशात बेरोजगारी वाढली असून, बरेच युवक गुन्हेगारीकडे वळले आहेत. मुलांनी ध्यानधारणा करावी, योगासने करावी. थोरामोठ्यांचा आदर करावा, असे आवाहन केले. संचिता सूर्यवंशी, लावण्या शिंदे, प्रेरणा शिंदे यांची न्या. रानडे यांच्या जीवनकार्यावर भाषणे झाली. श्रेया कुंदे हिने नृत्य सादर केले. प्रास्ताविक प्रणाली वडघुले हिने तर सूत्रसंचालन संस्कृती जाधव आणि आभार सृष्टी सोनवणे हिने मानले.

Web Title: The role of teachers is important in shaping the nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.