घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती

By admin | Published: March 1, 2016 10:35 PM2016-03-01T22:35:44+5:302016-03-01T22:36:15+5:30

घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती

Rooftop wander | घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती

घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती

Next

रामदास शिंदे  पेठ
मार्च महिना सुरू झाल्याबरोबर पेठ तालुक्यातील गाव-वाड्यांना वाढत्या उन्हाबरोबर पाणीटंचाईनेही ग्रासले असून, दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत चालली असताना सद्यस्थितीत तालुक्यातील केवळ दोन टँकरद्वारे चार गावांना पाणीपुरवठा केला जात असल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे़
पेठ तालुका तसा पावसाचे माहेर घर समजला जात असताना उन्हाळ्यात मात्र याच पावसाच्या राजाला घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत आहे़ पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडून दरवर्षी पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात येत असून, याही वर्षी शासनाला सादर केलेल्या कृती आराखड्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तीन टप्प्यातील उपाययोजनांचा आराखडा सादर करण्यात आला आहे़ सन २०१५-१६च्या टंचाई कृती आराखड्यातील तालुक्यातील ९० गावे व ६० वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा दाखविण्यात आल्या आहेत़ त्यापैकी १५ गावे व २ पाड्यांवर नळ पाणीपुरवठा योजना प्रगतीत असल्याचे नमूद आहे.

Web Title: Rooftop wander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.