आजारांचे मूळ कारण चुकीची अंघोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 04:31 PM2019-01-07T16:31:54+5:302019-01-07T16:32:00+5:30
पिंपळगाव बसवंत : खूप गरम पाणी घेऊन तसेच टबमध्ये आणि शॉवरखाली अंघोळ करणे चुकीचे आहे. यातून आपण अनेक आजारांना कळत नकळत आमंत्रण देत असतो. याशिवाय काहीजण घाईघाईने उघड्यावर अंघोळ करतात त्यातून अनेक आजार निर्माण होतात. हातपायांच्या वीस बोटांची नखं नेहमीच कापली गेली पाहिजेत, असे मत राजेंद्र मलोसे यांनी व्यक्त केले.
राजेंद्र मलोसे : पिंपळगाव बसवंत येथील वाघ महाविद्यालयात शिबिर
पिंपळगाव बसवंत : खूप गरम पाणी घेऊन तसेच टबमध्ये आणि शॉवरखाली अंघोळ करणे चुकीचे आहे. यातून आपण अनेक आजारांना कळत नकळत आमंत्रण देत असतो. याशिवाय काहीजण घाईघाईने उघड्यावर अंघोळ करतात त्यातून अनेक आजार निर्माण होतात. हातपायांच्या वीस बोटांची नखं नेहमीच कापली गेली पाहिजेत, असे मत राजेंद्र मलोसे यांनी व्यक्त केले.
पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर शिरवाडे वणी येथे सुरू असून, या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समन्वयक राजेंद्र कुरु ले, सचिन कुशारे, विकास जाधव, आश्विन कदम, सारिका गायकवाड, अल्ताप देशमुख आदी उपस्थित होते.
मलोसे पुढे म्हणाले, नियमित व्यायाम, व्यवस्थित झोप आणि मोबाइलचा कमीत कमी वापर हे जगण्याचे सूत्र ठेवा तर आरोग्यमय जीवन जगाल, असा सल्ला त्यांनी दिला. सूत्रसंचालन सत्यम उगले यांनी केले. आभार शुभम सोनवणे यांनी मानले.
यावेळी आकाश काटे, पंकज विसपुते, गौरव दाते, यशराज जाधव, कुंदन काळे, विजय वर्पे आदींसह स्वयंसेवक उपस्थित होते.(०७पिंपळगाव कॉलेज)