दोरीने गळा आवळून मृतदेह टाकला विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:14 AM2021-07-25T04:14:16+5:302021-07-25T04:14:16+5:30

साठेनगरच्या पाठीमागील बाजूस असलेल्या साळवे मळ्यात सकाळी हिरामण साळवे हे गेले असता त्यांना विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. ...

The rope was tied around the neck and the body was thrown into the well | दोरीने गळा आवळून मृतदेह टाकला विहिरीत

दोरीने गळा आवळून मृतदेह टाकला विहिरीत

Next

साठेनगरच्या पाठीमागील बाजूस असलेल्या साळवे मळ्यात सकाळी हिरामण साळवे हे गेले असता त्यांना विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे विहिरीत कुठले जनावर कोसळून मृत्युमुखी पडले आहे का? हे बघण्यासाठी ते विहिरीच्या दिशेने धावले. यावेळी विहिरीत डोकावून बघितले असता पाण्यावर एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी त्वरित

याबाबतची माहिती तत्काळ त्यांनी इंदिरानगर पोलिसांना कळविली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, यामुळे त्याची ओळख पटलेली नाही; मात्र या इसमाचा गळा आवळून खून करण्यात येऊन त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच कंबर व छातीच्या मध्यभागी दोरीदेखील आवळलेली असल्याचे दिसून आले. सुमारे दहा ते बारा दिवासांपूर्वी ही घटना घडली असावी, असेही पोलीस निरिक्षक नीलेश माईनकर यांनी सांगितले. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

--इन्फो--

देवतांचे चित्र गोंदवलेले

विहिरीत आढळलेल्या मृतदेहाच्या हातावर महादेवाच्या पिंडिचे व हनुमानाचे चित्र गोंदवलेले आहे. हा मृतदेह संपूर्णत: कुजला असून, मृतदेहाची ओळख पटविणे कठीण होत आहे. या ओळख खुणांवरून जर कोणी या मयत तरुणाला ओळखत असल्यास त्यांनी प्रत्यक्षपणे इंदिरानगर पोलीस ठाण्यात येऊन माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Web Title: The rope was tied around the neck and the body was thrown into the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.