गुलाब ३० रु. डझन तर मोगरा २४० रु. किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:15 AM2021-05-14T04:15:10+5:302021-05-14T04:15:10+5:30
चौकट- शेतकऱ्यांनी घेतला धसका फुल बाजारात अनेकांना कोरोनाची बाधा झाली असल्याने आणि ८ ते ९ जणांचा मृत्यू झाल्यामुळे अनेकांनी ...
चौकट-
शेतकऱ्यांनी घेतला धसका
फुल बाजारात अनेकांना कोरोनाची बाधा झाली असल्याने आणि ८ ते ९ जणांचा मृत्यू झाल्यामुळे अनेकांनी याचा धसका घेतला आहे. फुल बाजारात माल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आवक घटल्याने दरावर त्याचा परिणाम झाला असला तरी किरकोळ बाजारात फुलांना हवा त्या प्रमाणात उठाव नाही.
चौकट-
विविध फुलांचे घाऊक दर
झेंडू जाळी - २०० रु.
मोगरा - २४० रु. किलो
गुलाब - २५ ते ३० रु. डझन
लिली बंडल - १० रु.
शेवंती - १६० रु. किलो
गुलछडी -२४० रु. किलो
अष्टर - २०० रु. किलो
कोट-
लॉकडाऊनमुळे फुलांचा उठाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. फुलांची आवकही कमी आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्के इतकीही आवक नव्हती. ईदमुळे फुलांचे दर थोडेफार वाढले असले तरी त्याला ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळतो, यावरच व्यवसायाचे गणित अवलंबून आहे. अनेक शेतकरी बाजारात येण्याचे टाळत आहेत. - कृष्णकुमार गायकवाड, फुलविक्रेता