कळवणला रोटरी क्लब गरजूंना आर्थोपेडिक साहित्य पुरवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:17 AM2021-08-29T04:17:25+5:302021-08-29T04:17:25+5:30

प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव , नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पटेल, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष नयना ...

The Rotary Club will provide orthopedic supplies to the needy | कळवणला रोटरी क्लब गरजूंना आर्थोपेडिक साहित्य पुरवणार

कळवणला रोटरी क्लब गरजूंना आर्थोपेडिक साहित्य पुरवणार

Next

प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव , नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पटेल, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष नयना पगार, सचिव निर्मला संचेती, स्नेहा मालपुरे ,जयश्री शिरोरे, स्मिता खैरनार, माजी अध्यक्ष मोहन संचेती आदी उपस्थित होते. परिसरातील गरजू रूग्णांसाठी मोफत व्हीलचेअर, कमोड चेअर, वॉकर, बेड ,काठी, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर इत्यादी मेडिकल उपकरणे वापरासाठी मोफत पुरवण्यात येतील, अशी माहिती अध्यक्ष निलेश भामरे यांनी दिली.

लोकसहभागातून रोटरी क्लबने साहित्य खरेदी केले असून यासाठी डॉ. तुषार पगार ,महेश मोकळकर, संजय आनेराव, गजानन पतसंस्थेचे संस्थापक गजानन सोनजे, आनंद पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील जैन, कळवण मर्चंटचे माजी अध्यक्ष संजय मालपुरे, जानकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कोठावदे, दगडू अहिरे व रोटरी सदस्य यांनी आर्थिक मदत केली. यावेळी गंगाधर गुंजाळ, जितेंद्र कापडणे, राजेश मुसळे, निंबा पगार , प्रा. रवींद्र पगार, प्रमोद सूर्यवंशी, डॉ. आर. डी .भामरे, गंगा पगार, सुभाष जैन, डॉ. एस. बी. सोनवणे, प्रा. व्ही. डी. सोनवणे, प्रवीण संचेती, संजय बगे, बापू कुमावत, जयेश पगार, अविनाश पगार, सुवर्णा पगार, विद्या देवरे, विकेश बागुल आदी उपस्थित होते. प्रास्ताविक माजी सह प्रांतपाल विलास शिरोरे यांनी केले. सूत्रसंचालन हेमंत सोनवणे व आभार प्रदर्शन संभाजी पवार यांनी केले.

फोटो - २८ कळवण रोटरी

कळवण येथे रोटरी क्लबच्या मोफत आर्थोपेडिक साहित्य लायब्ररीच्या उदघाटनप्रसंगी महेश मोकळकर, निलेश भामरे, संभाजी पवार, विलास शिरोरे, नयना पगार, निर्मला संचेती, जितेंद्र कापडणे आदी.

280821\28nsk_26_28082021_13.jpg

कळवण येथे रोटरी क्लबच्या मोफत आर्थोपेडिक साहित्य लायब्ररीच्या उदघाटनप्रसंगी महेश मोकळकर, निलेश भामरे, संभाजी पवार, विलास शिरोरे, नयना पगार, निर्मला संचेती, जितेंद्र कापडणे आदी.

Web Title: The Rotary Club will provide orthopedic supplies to the needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.