रोटरी क्लबचा शिक्षकांसाठी डिजीटल कौशल्य कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:50 PM2020-08-03T17:50:37+5:302020-08-03T17:51:09+5:30
सिन्नर: तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांसाठी रोटरी क्लब (आर आय डी-3030,क्लब क्रमांक-73404) सिन्नर डिजीटल कौशल्य कार्यक्रम राबवत असून या ऑनलाइन प्रशिक्षणाचा तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय गायकवाड यांनी केले आहे.
सिन्नर: तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांसाठी रोटरी क्लब (आर आय डी-3030,क्लब क्रमांक-73404) सिन्नर डिजीटल कौशल्य कार्यक्रम राबवत असून या ऑनलाइन प्रशिक्षणाचा तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय गायकवाड यांनी केले आहे.
सर्व शिक्षकांसाठी मोफत डिजिटल स्किल फॉर स्मार्ट टिचींग कार्यक्रम रोटरी क्लबने आयोजित केला आहे. शैक्षणिक नवीन वर्ष तर सुरू झाले. शाळा पण सुरु व्हायला पाहिजेत. तशी परिस्थिती नाही. शाळा काही लगेच सुरु होऊ शकत नाहीत. परंतु शिक्षण नक्कीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले जाऊ शकते. काही ठिकाणी शिक्षकांनी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरु केले आहे. बरेच शिक्षक अजूनही या माध्यमांशी जुळवून घेऊ शकत नाहीत. म्हणून त्यांना सहाय्य म्हणून रोटरीच्या टिच या प्रोग्रॅममधील पहिला स्तंभ टिचर सपोर्ट (शिक्षकांना सहाय्य्) या अंतर्गत शिक्षकांसाठी मोफत डिजिटल कौशल्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. 5 दिवस चालणार्या या उपक्रमात 15 टीटी स्किल्सची सिरीज क्लब शिक्षकांच्या व्हाट्सऍप ग्रुपमध्ये पाठविण्यात येणार आहे. रोज 3 टीटी कौशल्ये व्हिडीओ आणि त्यावरील प्रश्न या ग्रुपमध्ये पाठविली जातील. पुढील दिवशी त्या प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडीओ नवीन कौशल्याचा व्हिडीओे आणि त्यावरील प्रश्न ह्या स्वरुपात ही सिरीज रोटरी क्लब पुढे नेणार आहे. शिक्षकांना व्हिडीओे रोजच्या रोज पाठविले जातील.सहावा दिवस सराव दिवस असेल.सातव्या दिवशी एक ऑनलाईन टेस्ट घेतली जाईल.टेस्ट सबमिट केली की, शिक्षकांना लगेच सहभागाचे ई-प्रमाणपत्र ई-मेलद्वारे पाठवले जाईल असे उदय गायकवाड, निशांत माहेश्वरी यांनी सांगितले.