कोरोनाकाळात रोटरीचे काम उल्लेखनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:24 AM2021-02-18T04:24:28+5:302021-02-18T04:24:28+5:30
येथील हॉटेल पंचवटीच्या सभागृहात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी श्रीमती तोबे भागवागर, दिलीपसिंंग बेनिवाल, ...
येथील हॉटेल पंचवटीच्या सभागृहात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी श्रीमती तोबे भागवागर, दिलीपसिंंग बेनिवाल, अतुल शहा, रोटरी क्लब गोंदेश्वरचे अध्यक्ष महेश बोऱ्हाडे, सचिव अनिल गोर्डे, रोटरी क्लब सिन्नरचे अध्यक्ष उदय गायकवाड, सचिव निशांत माहेश्वरी आदी उपस्थित होते. शाकीर यांनी नुकतीच सिन्नर येथे भेट देऊन रोटरी क्लबच्या कामाचा आढावा घेतला. समाजाबरोबरच रोटरी क्लबदेखील आपला परिवार आहे. ही भावना जोपासून परिवाराची सेवा करण्याकडे देखील लक्ष पुरवावे. गेल्या पाच ते सहा वर्षात क्लब सोडून गेलेल्या सदस्यांना पुन्हा या परिवारात सामील करण्याचे कर्तव्य समजून आग्रही भूमिका घ्यावी असे आवाहनही शाकीर यांनी केले.
कोरोनासारख्या कठीण काळात आव्हानात्मक काम पेलले, ही दोन्ही क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्याची पावती असल्याचे श्रीमती तोबे म्हणाल्या. अतुल शहा यांनी एकसंघपणे कार्य करत रहावे असे सांगून उत्कृष्ट कामाबद्दल पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. तळ्यातील भैरवनाथ मंदिर परिसरात ग्रीन रिव्हेल्यूशनच्या सहकार्याने सुरू असलेल्या वृक्षारोपण मोहिमेचे शब्बीर शाकीर, तोबे यांच्यासह मान्यवरांनी कौतुक केले. उपस्थितांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. महेश बोऱ्हाडे, उदय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. उपप्रांतपाल पदावर संजय आणेराव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सतीश नेहे यांनी सूत्रसंचालन केले. किरण वाघ यांनी आभार मानले.