नवी शेमळी येथे मका पिकावर फिरवला रोटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 01:01 AM2019-08-14T01:01:46+5:302019-08-14T01:02:29+5:30
मक्याच्या बियाणात फसवणूक झाल्याने नवी शेमळी, ता. बागलाण येथील अल्पभूधारक शेतकरी प्रवीण विलचंद वाघ यांनी आपल्या मका पिकावर रोटर फिरविला आहे.
जुनी शेमळी : मक्याच्या बियाणात फसवणूक झाल्याने नवी शेमळी, ता. बागलाण येथील अल्पभूधारक शेतकरी प्रवीण विलचंद वाघ यांनी आपल्या मका पिकावर रोटर फिरविला आहे.
मका लागवडीसाठी त्यांना साधारण दहा ते बारा हजार रु पये खर्च आला. मका उगवतानाच लाल उगवत होता. नंतर पूर्णपणे करपून गेला. आमच्या वाणाला कुठल्याही प्रकारची अळी व रोग येणार नाही असा दावा सदर मका बियाणे कंपनीने केला होता.
मात्र आम्ही मका पिकावर ३ फवारण्या करूनसुद्धा अळी नियंत्रणात आली नाही. शेवटी कंपनी प्रतिनिधीशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, अशी माहिती संबंधित शेतकऱ्यानेदिली. सदर कंपनीची चौकशी करावी अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.