फिरते झुणका-भाकर केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 08:26 PM2020-04-17T20:26:42+5:302020-04-18T00:29:19+5:30
सिन्नर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पहिले लॉकडाउन संपत असतानाच केंद्र सरकारने दुसऱ्यांदा ३ मे पर्यंत लॉकडाउन घोषित केले असून गोरगरीब, कंत्राटी कामगार, विडी कामगार, रोजंदारी करणारे मजूर व समाजातील अनेक घटकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
सिन्नर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पहिले लॉकडाउन संपत असतानाच केंद्र सरकारने दुसऱ्यांदा ३ मे पर्यंत लॉकडाउन घोषित केले असून गोरगरीब, कंत्राटी कामगार, विडी कामगार, रोजंदारी करणारे मजूर व समाजातील अनेक घटकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अशा गरजू लोकांसाठी ‘कामगार शक्ती’ फाउण्डेशन सरसावली असून, शहरासह उपनगरांतील गरजू लोकांसाठी फिरते झुणका-भाकर केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या फिरत्या झुणका-भाकर केंद्राचा शुभारंभ कमलनगर येथून करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार, मार्गदर्शक किरण भावसार, सरचिटणीस रवींद्र गिरी, खजिनदार किरण भोसले, संतोष नवले, संतोष कदम, सुभाष मोकळ, पुनीत सोनवणे, विक्रम मिटगे, कैलास थोरात, किरण गायकवाड, कैलास सांगळे, सुरेश खवले, संजय सरवार, उल्हास सरवार, नवनाथ सरवार यांच्यासह इतर पदाधिकारी व सर्व सभासद उपस्थित होते.
लॉकडाउन वाढविण्यात आल्याने दोन्ही औद्योगिक वसाहतींमधील कंपन्या बंद असून, बहुतांश कामगारांना लॉकडाउन काळातील पगारही कंपन्यांनी अद्याप दिलेला नाही. परिणामी अनेक कामगार कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. याशिवाय कंत्राटी कामगार, रोजंदारी करणारे मजूर,
विडी कामगार, घर कामगार
यासारखे घटकही अडचणीत सापडले असून, घरात अन्नधान्य नाही, खिशात पैसा नाही अशा परिस्थितीत दोनवेळच्या जेवणाची भ्रांत या घटकांपुढे आहे.
कामगारांच्या हितासाठी सामाजिक कार्य करणाºया कामगार शक्ती फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या विदारक
स्थितीत गरजू कामगार कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी फिरते झुणका-भाकर केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. फाउण्डेशनच्या सभासदाने आपापल्या परिसरात सर्व्हे करून खºया अर्थाने गरजूंचा शोध घेऊन यादी तयार केली. त्यानुसार नियोजन करून या फिरत्या झुणका-भाकर केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.