शहरात सर्रासपणे ‘रोलेट’ सुरू
By admin | Published: June 16, 2017 06:27 PM2017-06-16T18:27:21+5:302017-06-16T18:27:21+5:30
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष : युवापिढीला भुरळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक - शहरात काही दिवसांपुर्वी पोलीसांनी छापे मारून रोलेटचे अड्डे उद्धवस्त केले असले तरी आता रोलेट गेम चालविणाऱ्या अवैद्य धंदे चालकांनी थेट मोेबाईलवरच रोलेट आयडी सुरू केले आहेत. विशेष म्हणजे आता थेट मोबाईलवर आॅनलाईन रोलेट खेळविला जात असला तरी याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सध्या नाशिक शहरातील पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिकरोड, अंबड, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा परिसरातील सर्वच भागातील रोलेट व्यवसाय करणारे अवैद्य व्यवसायिक मोबाईलवरूनच रोलेट आयडी मिळवून रोलेट गेम खेळणाऱ्यांना पॉर्इंट पुरविण्याची व्यवस्था करीत आहेत. सध्या सर्वाधिक तरूण पिढी व कॉलेज तसेच शाळकरी विद्यार्थी या रोलेट गेमच्या आहारी गेले असुन काही जण अक्षरश: बरबाद झाले आहेत. मोबाईलवरूनच रोलेट गेमचा आयडी तसेच पॉर्इंट देण्याचे काम केले जात असल्याने पडद्याच्या आडून हा अवैद्य व्यवसाय सुरू आहे.
रोलेटचा अवैद्य व्यवसाय करणारे रोलेट आयडी घेऊन युवा पिढीला पार्इंट विक्री करून त्यामागे भरमसाठ कमिशन कमवितात. सध्या शहरासह पंचवटीत सर्वाधिकपणे रोलेटची भुरळ शाळकरी तसेच महाविद्यालयीन युवकांना पडली असुन यातून काही महिन्यांपुर्वीच पैसे वसुलीच्या कारणावरून वाद झाल्याच्याही घटना घडलेल्या होत्या.