‘रौलेट’चा कर्ज अन् सुपरवायझरने रेल्वेसमोर संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:20 AM2021-08-25T04:20:35+5:302021-08-25T04:20:35+5:30
याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र हे सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये एका लॉजिस्टिक कंपनीत सुपरवायझर पदावर नोकरीस होते. मोबाईलवरील ...
याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र हे सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये एका लॉजिस्टिक कंपनीत सुपरवायझर पदावर नोकरीस होते. मोबाईलवरील रोलेट बिंगो गेम खेळण्याचे गेल्या तीन वर्षांपासून राजेंद्र यांना व्यसन लागले होते. यामध्ये ते कधी जिंकायचे तर कधी हारायचे. हरल्यानंतर ते त्याच्या नातेवाईक व मित्रांकडून उसनवारीने पैसे घेत असल्याचे समोर आले आहे. यामुळे त्यांच्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज झाले होते. कर्जबाजारी झाल्यामुळे उसनवार घेतलेले पैसे मिळवण्यासाठी संबंधितांचा तगादा वाढला होता. त्यामुळे शुक्रवार (दि. २०) सायंकाळी कामावरून थेट घोटीला मावशीच्या घराजवळ दुचाकी लावून कोणालाही न सांगता घोटी रेल्वेस्थानक गाठले. मद्यप्राशन करत नशेत राजेंद्र यांनी रात्री १० वाजेच्या सुमारास धावत्या सुपरफास्ट पंजाब मेल या रेल्वे एक्स्प्रेससमोर रेल्वे रुळावर उभे राहून आत्महत्या केली. मृतदेह छिन्नविछिन्न झाल्याने त्यांची ओळख पटविणे अवघड होत होते. याबाबत रेल्वे चालकांनी प्रत्यक्षदर्शी म्हणून माहिती दिली आहे. दि.२३ रोजी रेल्वे पोलीस यांना आत्महत्या करणारा राजेंद्र असल्याचे ओळख पटली. याबाबत घोटी रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.