‘रोलेट’च्या म्होरक्याची तुरुंगात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:15 AM2021-03-14T04:15:29+5:302021-03-14T04:15:29+5:30
ऑनलाइन रोलेट जुगारात आर्थिक आमिष दाखवून युवकांना जुगार खेळण्यास प्रवृत्त करत, त्यांना उधारीवर जुगार खेळण्याची मुभा देत व्यसनाधीन बनविल्याचे ...
ऑनलाइन रोलेट जुगारात आर्थिक आमिष दाखवून युवकांना जुगार खेळण्यास प्रवृत्त करत, त्यांना उधारीवर जुगार खेळण्याची मुभा देत व्यसनाधीन बनविल्याचे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथील संदीप दिलीप मेढे (२७) याने रोलेट शेतजमीन विक्रीच्या माध्यमातून मिळालेल्या रकमेतील सुमारे पाच लाखांपेक्षा अधीक रक्कम रोलेटमध्ये गमावली, तसेच संशयितांकडून वारंवार मिळणाऱ्या धमक्यांनी त्रस्त होऊन संदीपने आत्महत्या केल्याप्रकरणी त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात शहा याचे साथीदार शांताराम पगार, सुरेश अर्जुन वाघ यांचाही सहभाग आहे. ग्रामीण पोलिसांनी तपास करून कैलास शहाला अटक केली. त्यास न्यायालयाने दोन दिवसांपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने, त्यास पुन्हा पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.