महावितरणला १५ लाखांच्या भरपाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:33 AM2019-06-18T00:33:29+5:302019-06-18T00:33:47+5:30

नियमित वीज बिल भरूनही ग्राहकाच्या वीज मीटरमध्ये दोष दाखवून दंड आकारल्याप्रकरणी न्यायालयात धाव घेतलेल्या ग्राहकाला महावितरणने १६ लाखांची भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत.

Rs 15 lakh compensation order for Mahavitaran | महावितरणला १५ लाखांच्या भरपाईचे आदेश

महावितरणला १५ लाखांच्या भरपाईचे आदेश

Next

नाशिक : नियमित वीज बिल भरूनही ग्राहकाच्या वीज मीटरमध्ये दोष दाखवून दंड आकारल्याप्रकरणी न्यायालयात धाव घेतलेल्या ग्राहकाला महावितरणने १६ लाखांची भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत.
नाशिकमधील सेवानिवृत्त न्यायाधीश दिलीप जोशी हे ठाणे येथील रेंभीनाका जवळील एका सोसायटीत राहतात. त्यांना येणारे बिल त्यांनी वेळोवेळी भरलेले आहे. असे असतानाही वीज मीटर तपासणीसाठी आलेल्या भरारी पथकाचे अभियंता पी. एस. दरोली यांनी सदोष वीजमीटर म्हणून १६ हजारांचा दंड आकारला. तसेच त्यांचा वीजपुरवठादेखील खंडित केला. या प्रकरणी जोशी यांनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने त्यांचे बिल रद्द केले. त्यावर जोशी यांनी वीज कंपनीवर बदनामीची केस दाखल केली व न्यायालयाने वीज कंपनीचे अधिकारी पी.एस. दरोली यांना १० लाखांचा दंड केला असून सदर दंडभरपाई जोशी यांना देण्याचे आदेश दिले. न्यायालयाने ग्राहक हितासाठी दिलेल्या निर्णयाचे ग्राहक समितीचे अनिल नांदोडे, कृष्ण गडकर, जगन्नाथ नाठे, अ‍ॅड. सिद्धार्थ वर्मा, श्रीकांत खाडीलकर यांनी स्वागत केले.

Web Title: Rs 15 lakh compensation order for Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.