‘स्टार्टअप’साठी राज्यात २५० कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:27 AM2018-08-18T00:27:03+5:302018-08-18T00:28:10+5:30
उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीसाठी सरकारचा प्रयत्न असून, शासनाच्या माध्यमातून २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यातून स्टार्टअपसाठी दहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहकार्य करण्याची शासनाची भूमिका असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच्या वतीने विनजितच्या मुख्य फिनटेक अधिकारी सुनीती नंदा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातपूर : उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीसाठी सरकारचा प्रयत्न असून, शासनाच्या माध्यमातून २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यातून स्टार्टअपसाठी दहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहकार्य करण्याची शासनाची भूमिका असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच्या वतीने विनजितच्या मुख्य फिनटेक अधिकारी सुनीती नंदा यांनी पत्रकार परिषदेत दिली. सातपूर औद्योगिक वसाहतीतील विनजित कंपनीत आलेल्या फिनटेक यात्रेबाबत नंदा यांनी सांगितले की,राज्य शासनाच्या माध्यमातून ‘स्टार्टअप’ प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या फिनटेक यात्रेद्वारे देशभरातील १६ राज्यामधील ५०० युवकांच्या भेटी घेऊन त्यांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती संकलित करण्यात आली आहे. जागा, मनुष्यबळ, उत्पादन व ग्राहक या सर्वांच्या उपलब्धते सोबतच पुढील तीन वर्षांत २५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्टार्टअप रजिस्ट्रेशन सूरू करण्यात आले असून, त्यात ७० स्टार्टअपची नोंदणी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी फिनटेकचे संचालक अभिशांत पंत यात्रेसंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यात त्यांनी स्टार्टअपसाठी अत्यावश्यक धोरणांत भांडवल, ग्राहक व त्यासाठीची इको सिस्टीम गरजेची असल्याचे सांगितले. दिवसभरात नाशिक परिसरातील आठ स्टार्टअपला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला.
फिनटेक रॅली मुंबई, पुणे, हैद्रराबाद, बंगळूरू, कोचीन, चेन्नई, विझाग, भुवनेश्वर, कोलकाता, लखनऊ, दिल्ली, चंदीगड, जंयपूर, अहमदाबाद, नाशिक व मुंबई येथे समाप्त करण्यात येणार आहे. यावेळी विनजितचे संचालक अश्विन कंदोई, अभिजीत जुनागडे डॉ.सचिन पाचोरकर आदी उपस्थित होते.
यात्रा विनजित सॉफ्टवेअरमध्ये
पुढील महिन्यात नव्याने नोंदणी सुरू करण्यात येणार असून, आपल्या प्रकल्पांची नोंदणी करण्याचे आवाहन नंदा यांनी केले. या उपक्रमांसाठी देशभरातून ६५० ते ७०० अर्ज दाखल झाले आहेत, तर राज्यातून १७० ते १८० अर्ज दाखल झाले आहेत. त्यात ८ ते ९ अर्ज नाशिक विभागातून आहेत. ही यात्रा देशभरातील साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करून परतीच्या प्रवासात नाशिकला ‘विनजित’ सॉफ्टवेअरमध्ये दाखल झाली.