येवला येथे तीन लाख रु पयांची रोकड लांबविली
By admin | Published: June 24, 2016 12:16 AM2016-06-24T00:16:29+5:302016-06-24T00:25:05+5:30
येवला येथे तीन लाख रु पयांची रोकड लांबविली
येवला : शहरातील मध्यवस्तीत असलेल्या बँक आॅफ बडोदा समोर गुरुवारी पैसे पडल्याचा बहाणा करून मोटारसायकलला अडकवलेली 3 लाख रु पयाची रोकड असलेली बॅग अज्ञाताने हातोहात लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी रवींद्र जगताप (रा. येवला ) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
रवींद्र जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहे. गुरुवारी कामगारांना पगार देण्यासाठी त्यांनी गंगादरवाजा येथील बँक आॅफ बडोदाच्या शाखेतून तीन लाख रु पये काढले. त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या बॅगेत तीन लाख रु पये ठेऊन बॅग (एम.एच.१५सी.एक्स.८८०३) या मोटरसायकलला अडकवली. याचवेळी मोबाईल वाजल्याने फोनवर बोलत असताना एक इसम त्याच्या डाव्या बाजूला फोनवर बोलत होता. त्याचवेळेला दुसऱ्या बाजूने अनोळखी व्यक्तीने मागे पैसे पडल्याचे जगताप यांना सांगितले. त्यामुळे जगताप मागे पाहत असताना मोटारसायकलच्या हँडलला अडकवलेली रोकडची बॅग हातोहात लंपास केली. (वार्ताहर)