रब्बीसाठी तीन हजार कोटींचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:48 AM2018-05-11T01:48:46+5:302018-05-11T01:48:46+5:30
नाशिक : जिल्ह्याच्या विविध घटकांच्या पतपुरवठ्यासाठी तयार करण्यात आलेल्या जिल्हा वार्षिक पत आराखड्याचे प्रकाशन गुरुवारी (दि. १०) करण्यात आले.
नाशिक : जिल्ह्याच्या विविध घटकांच्या पतपुरवठ्यासाठी तयार करण्यात आलेल्या जिल्हा वार्षिक पत आराखड्याचे प्रकाशन गुरुवारी (दि. १०) करण्यात आले. या आराखड्यात यंदाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी ३ हजार ७५५ कोटी रुपयांच्या पतपुरवठ्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
गुरुवारी (दि. १०) जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते या पतपुरवठ्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी लीड बॅँक तथा बॅँक आॅफ महाराष्टÑचे विभागीय व्यवस्थापक दिनेश तांबट, नूतन विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब ताव्हरे, मुख्य व्यवस्थापक भरत बर्वे, बॅँक आॅफ इंडियाचे तुषार पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे किशोर कदम, सेंट्रल बॅँक आॅफ इंडियाच्या ममता सिंग, महिला आर्थिक विकास महामंडळाचे अशोक चव्हाण आदी उपस्थित होते. यात खरीप पिकांसाठी २ हजार ६२५, तर रब्बी हंगामासाठी ११३० कोटी रुपयांची तरतूद आहे. त्याचबरोबर कृषी आधारित घटकांसाठी व मुदत कर्जासाठी २ हजार ४७० कोटी रुपयांच्या योजना निश्चित करण्यात आल्या आहेत, असे बॅँक आॅफ महाराष्टÑने तयार केलेल्या पतपुरवठा आरखड्यात नमूद केले आहे. याचबरोबर जिल्ह्णातील बॅँक क्षेत्राच्या कामांची माहिती यावेळी देण्यात आली. बॅँक शाखांमध्ये वाढ होऊन ४२ बॅँकांच्या एकूण ७८२ शाखा जिल्ह्णात कार्यरत आहेत. विविध स्मॉल फायनान्स बॅँका व खासगी बॅँकांनीदेखील जिल्ह्णात आपला व्यवसाय वाढविल्याचे यावेळी सांगण्यात आले. नाशिक कृषी उत्पादनाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाचा जिल्हा असून, निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील बॅँकिंग क्षेत्राने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या पत आराखड्यात जिल्ह्यातील खरीप व रब्बी पिकांसाठी एकूण ३ हजार ७५५ कोटी रुपयांच्या पतपुरवठ्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.