महापालिकेच्या खजिन्यात ५०६ कोटी रुपये एलबीटी

By admin | Published: November 18, 2016 12:33 AM2016-11-18T00:33:28+5:302016-11-18T00:29:47+5:30

नोटाबंदी : आगाऊ वसुलीबाबत विचारणा

Rs. 506 crores LBT in municipal treasure | महापालिकेच्या खजिन्यात ५०६ कोटी रुपये एलबीटी

महापालिकेच्या खजिन्यात ५०६ कोटी रुपये एलबीटी

Next

 नाशिक : मोदी सरकारने पाचशे व एक हजारच्या नोटा चलनातून बाद ठरविल्यानंतर महापालिकेला घरपट्टी-पाणीपट्टीसह विविध कर वसुलीसाठी नोटा स्वीकारण्याची परवानगी दिली, परंतु काही बड्या करदात्यांनी एलबीटीबाबतही आगाऊ रकमेचा भरणा करण्याची तयारी दर्शविल्याचे आणि त्याबाबत विचारणा केल्याचे वृत्त आहे. परंतु, एलबीटीची वसुली ही धनादेश स्वरूपातच केली जात असल्याने संबंधितांची अडचण झाली. दरम्यान, महापालिकेच्या खजिन्यात गेल्या सात महिन्यांत एलबीटीच्या माध्यमातून ५०६ कोटी रुपये जमा झाले असून, त्यात शासनाकडून २२१ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.
पाचशे-हजारच्या नोटा चलनातून बाद ठरविण्याचा निर्णय घेतला आणि नंतर राज्य शासनाने महापालिकेला करवसुलीसाठी सदर नोटा स्वीकारण्याची परवानगी दिली. त्यानुसार, घरपट्टी, पाणीपट्टी, विविध कर वसुलीसह नगररचनाकडून केली जाणारी शुल्क आकारणी या माध्यमातून महापालिकेच्या खजिन्यात सुमारे १७ कोटी रुपयांची भर पडली आहे. नोटाबंदीवरून सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली असताना काही बड्या करदात्यांनी महापालिकेकडे एलबीटीचाही भरणा करता येईल काय, अशी विचारणा केल्याचे समजते. परंतु, एलबीटी विभागामार्फत दर महिन्याच्या २० तारखेपर्यंत धनादेशामार्फत अथवा आरटीजीएसद्वारे संबंधित कंपन्या, व्यापारी व व्यावसायिक आस्थापना एलबीटीचा भरणा करत असतात.

Web Title: Rs. 506 crores LBT in municipal treasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.