नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी लाख रुपये मदत करावी - अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 05:10 PM2023-04-12T17:10:56+5:302023-04-12T17:11:28+5:30

हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून वाचविण्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना साकडे घालणार आहोत.

Rs.1 lakh per acre should be given to the affected farmers says Ambadas Danve | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी लाख रुपये मदत करावी - अंबादास दानवे

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी लाख रुपये मदत करावी - अंबादास दानवे

googlenewsNext

बाजीराव कमानकर

सायखेडा (जि. नाशिक) : निफाड तालुक्यात सलग चार दिवस अवकाळी पाऊस झाल्याने नुकसान झालेल्या द्राक्ष, कांदा, गहू यासह भाजीपाला पिकांचे तात्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये मदत सरकारने करावी. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून वाचविण्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना साकडे घालणार आहोत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत सरकारला धारेवर धरणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी दिली. चांदोरी येथे नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार अनिल कदम, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, चांदोरीचे सरपंच विनायक खरात माजी सरपंच संदीप टर्ले, शिवसेना तालुका प्रमुख सुधीर कराड, खंडू बोडके यासह शेतकरी उपस्थित होते.

चांदोरी येथील बाळासाहेब आहेर या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी केली. कांदा उत्पादक सोमनाथ सोनवणे यांच्या कांद्याची पाहणी केली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांनी द्राक्ष बागेसह कांदा, गहू व भाजीपाला या पिकांचीही पाहणी करत सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, महिला आघाडीच्या अध्यक्षा भारती जाधव, सुलभा पवार, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, बीडीओ संदीप कराड, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ढेमसे, सोमनाथ बस्ते, संजय भोज, दौलत टरले, प्रवीण कोरडे, संजय कोरडे, रवी आहेर, विष्णू कोरडे, अमर आहेर, अभिजित शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

कांदा उत्पादकांची थट्टा

दानवे म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान देऊन थट्टा केली आहे. राज्यात सर्वत्र अवकाळीने शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. तरीही शिंदे सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणे घेणे नसून डिसेंबरमध्ये जाहीर केलेली मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसल्याची टीका करत दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

 

Web Title: Rs.1 lakh per acre should be given to the affected farmers says Ambadas Danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.