आरएसएस जनकल्याण समितीचे ‘कोविड झिरो’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:23 PM2020-07-24T22:23:04+5:302020-07-25T01:12:51+5:30

नाशिक : महानगरात कोरोनाबाधित सापडण्याचे प्रमाण दिवसाला पाचशेहून अधिकपर्यंत पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर राष्टÑीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून ‘मिशन झिरो कोविड’ला शनिवारपासून प्रारंभ करण्यात येणार आहे.

RSS Janakalyan Samiti's 'Kovid Zero'! | आरएसएस जनकल्याण समितीचे ‘कोविड झिरो’ !

आरएसएस जनकल्याण समितीचे ‘कोविड झिरो’ !

Next

नाशिक : महानगरात कोरोनाबाधित सापडण्याचे प्रमाण दिवसाला पाचशेहून अधिकपर्यंत पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर राष्टÑीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून ‘मिशन झिरो कोविड’ला शनिवारपासून प्रारंभ करण्यात येणार आहे.
नाशिकमधील कोविडबाधितांची वाढ रोखण्यासाठी ठिकठिकाणी स्क्रिनिंग करून संशयित रु ग्ण शोधून काढणे आवश्यक आहे. म्हणून कंटेन्मेंट परिसरातील व्यक्तींचे टेंपरेचर घेणे, आॅक्सिजन पातळी तपासणे, शंका आल्यास तिथेच स्वॅब घेणे, गरज वाटल्यास त्वरित पेशंटला हॉस्पिटलला अ‍ॅडमिट करणे याप्रकारे काम कण्यात येणार आहे. या उपक्रमाला प्रारंभिक टप्प्यात शनिवार (दि. २५) आणि रविवार (दि.२६) असे दोन दिवस चालेल. देशाच्या अनेक शहरातील संघ स्वयंसेवकांनी स्थानिक प्रशासनासोबत स्क्रिनिंग कामात सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे नाशकातही प्रशासनाचे सोबत मिशन झिरो कोविड उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक संघ कार्यकर्ते तसेच अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.
--------------
अशी राबवणार मोहीम
प्रत्येक सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकाला पीपीई किट घालून स्क्रिनिंगसाठी कंटेन्मेंट क्षेत्रात जावे लागणार आहे. त्या पथकात एका तज्ज्ञासह अन्य दोन स्वयंसेवकांचा समावेश राहणार आहे. दररोज किमान सहा तास काम करावे लागणार आहे. तसेच माता-भगिनींचे स्क्रिनिंग सुलभपणे करता यावे यासाठी ज्या महिला, युवती या मोहिमेत स्वयंसेवक सहभागी होतील, त्यांचाही सहभाग घेतला जाणार आहे.

Web Title: RSS Janakalyan Samiti's 'Kovid Zero'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक