जिल्ह्यातील ४५० शाळांमध्ये शुक्रवारपासून आरटीई प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:18 AM2021-06-09T04:18:52+5:302021-06-09T04:18:52+5:30

नाशिक : कोरोना संकटामुळे अन्य क्षेत्रांप्रमाणेत शिक्षण क्षेत्रही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून, लॉटरी जाहीर झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांपासून ...

RTE admission in 450 schools in the district from Friday | जिल्ह्यातील ४५० शाळांमध्ये शुक्रवारपासून आरटीई प्रवेश

जिल्ह्यातील ४५० शाळांमध्ये शुक्रवारपासून आरटीई प्रवेश

Next

नाशिक : कोरोना संकटामुळे अन्य क्षेत्रांप्रमाणेत शिक्षण क्षेत्रही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून, लॉटरी जाहीर झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांपासून रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया शुक्रवार (दि. ११)पासून पुन्हा सुरू होणार आहे. आरटीई अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील ४५४४ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ७ एप्रिलला प्रवेशासाठीची सोडत जाहीर केली असून, सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून एसएमएसही प्राप्त झाले आहेत. सोडतीत राज्यातील ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, यात नाशिकमधील ४२०८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना लॉटरीत प्रवेशाची संधी मिळूनही कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया रखडली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या निर्बंधांमुळे ठप्प झालेली प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून पुन्हा सुरू होणार असून, या प्रवेश प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा निर्णय आपल्या स्तरावरून घेण्यात यावा, असे शिक्षण संचालकांनी म्हटले आहे. दरम्यान, लॉटरीच्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता २० दिवसांचा कालावधी देण्यात येणार असून, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी शाळेत गर्दी करू नये, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

------

जिल्ह्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेची स्थिती

जिल्ह्यातील शाळा - ४५०

उपलब्ध जागा - ४५४४

विद्यार्थ्यांचे प्राप्त अर्ज - १३, ३३०

निवड झालेले विद्यार्थी - ४२०८

Web Title: RTE admission in 450 schools in the district from Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.