आरटीईची दुसरी राज्यस्तरीय सोडत जाहीर ; पालकांना सोमवारी मिळणार एसएमस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 07:02 PM2019-06-15T19:02:46+5:302019-06-15T19:04:16+5:30
आरटीई प्रवेशप्रक्रियेची लांबलेली दुसरी राज्यस्तरीय सोडत शनिवारी (दि.१५) पुण्यातून काढण्यात आली आहे. मात्र या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना यासंदर्भात सोमवारी एसएमएसद्वारे ही माहिती उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारे माहिती न मिळणाºया पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता संकेतस्थळावर आॅनलाइन अर्जाचा क्रमांक टाकून खात्री करून घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेची लांबलेली दुसरी राज्यस्तरीय सोडत शनिवारी (दि.१५) पुण्यातून काढण्यात आली आहे. मात्र या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना यासंदर्भात सोमवारी एसएमएसद्वारे ही माहिती उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारे माहिती न मिळणाºया पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता संकेतस्थळावर आॅनलाइन अर्जाचा क्रमांक टाकून खात्री करून घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
आरटीई प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या सोडतीत जिल्ह्यातील तीन हजार ५१७ विद्यार्थ्यांना संधी मिळाली होती. मात्र पहिल्या फे रीअंती केवळ दोन हजार ४८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, उर्वरित तीन हजार २५१ जागांसाठी तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर दुसरी सोडत काढण्यात आली. या सोडतीचा तपशील सोमवारी जाहीर केला जाणार आहे. अशाप्रकारे सोडत जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी त्याचा तपशील जाहीर करूनही आरटीई प्रवेशप्रक्रियेत खोटे पत्ते, एकच विद्यार्थ्याच्या नावाचे व पत्त्याचे दोन वेगवेगळ्या जन्मतारखांचे अर्ज सोडतीत निवडले गेले होते. विशेष म्हणजे अशा विद्यार्थ्यांचे पहिल्या फेरीत प्रवेशही झाले आहेत. त्यामुळे अशाप्रक ारे सोडत जाहीर करण्याच्या प्रक्रियेविषयी पालकांमधून साशंकता व्यक्त होत असताना दुसरी सोडतही याचपद्धतीने काढण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातून सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांचे पालक या सोडतीच्या प्रतीक्षेत होते. त्यांची प्रतीक्षा संपली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ४५७ शाळांतील ५ हजार ७३५ जागांसाठी तब्बल १४ हजार ९९५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पहिल्या फेरीत २ हजार ४८४ जागांवर प्रवेश झाले असून, उर्वरित तीन हजार ५१७ जागांवर दुसºया फेरीत प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. आरटीई प्रवेशासाठी दरवर्षी जिल्हास्तरावर काढण्यात येणारी सोडत या वर्षापासून राज्यस्तरावर काढण्यात येत आहे. तसेच मागील वर्षी सात सोडतींमध्ये झालेली ही प्रक्रिया यंदा चार सोडतींमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र, दुसरी सोडत जाहीर होण्यातच अर्धा जून उलटल्याने आरटीईची प्रवेशप्रक्रिया पूर्ण कधी होणार? असा सवाल उपस्थित करतानाच किमान दुसरी फेरी कोणत्याही गोंधळाशिवाय लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी अपेक्षा प्रतीक्षेत असलेल्या पालकांकडून व्यक्त होत आहे.