आरटीईची पुण्यातून सोडत ; बुधवारी पालकांना मिळणार एसएमस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 06:50 PM2019-04-08T18:50:25+5:302019-04-08T19:00:17+5:30

आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी पहिली सोडत सोमवारी (दि.८) पुण्यातून जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरातील आरटीई प्रवेशाच्या १ लाख १६ हजार ९२६ जागांची लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात नाशिक जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या १४ हजार ९९५ अर्जांचाही समावेशअसून जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये यंदा ५ हजार ७६४ जागांवर ही प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. 

RTE dropping from Pune; Sms to get parents on Wednesday | आरटीईची पुण्यातून सोडत ; बुधवारी पालकांना मिळणार एसएमस

आरटीईची पुण्यातून सोडत ; बुधवारी पालकांना मिळणार एसएमस

googlenewsNext
ठळक मुद्देआरटीईच्या प्रथम सोडतीने प्रवेश प्रक्रियेला सुरुवात पालकांना बुधवारी एसएमएस, गुरुवारी यादीद्वारे मिळणार माहिती

नाशिक : आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी पहिली सोडत सोमवारी (दि.८) पुण्यातून जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरातील आरटीई प्रवेशाच्या १ लाख १६ हजार ९२६ जागांची लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात नाशिक जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या १४ हजार ९९५ अर्जांचाही समावेशअसून जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये यंदा ५ हजार ७६४ जागांवर ही प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. 
दरवर्षी जिल्हा स्तरावर होणारी सोडत यंदा राज्यस्तरावर काढण्यात आली असून संपूर्ण राज्यभरात ही प्रक्रिया एकाचवेळी राबविण्यात येत आहे. पुण्यात सोमवारी संपूर्ण राज्यभराची लॉटरी काढल्यानंतर बुधवारी (दि.१०) आरटीई प्रवेशासाठी अर्ज करणाºया पालकांना त्यांच्या पाल्यांना सोडतीत संधी मिळाली किंवा कसे याविषयी मोबाईलवर मेसेज मिळणार आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी (दि.११) पडताळणी समितीच्या माध्यमातून शहरात इंदिरानगर, नाशिकरोड, गंगापूररोड व पंचवटी भागातील प्रत्येकी एका शाळेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादीही प्रदर्शित करण्यात येणार आहे. परंतु,पालकांनी केवळ एसएमएस व याद्यांवर अवलंबून न राहता पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशाची कार्यवाही सुरू करावी असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. त्याचप्रमाणे संकेतस्थळावर जाऊनही लॉटरी लागली आहे की नाही त्याची पडताळणी करावी,  लॉटरी लागली असल्यास आपल्याला अलॉट झालेल्या शाळेच्या पत्राची प्रिंट काढावी, या अलॉटमेंट लेटरवर शाळेच्या जवळील पडताळणी समितीची नावे आणि पत्ता दिला जाणार आहे. पालकांनी ज्या शाळेत लॉटरी लागली आहे. त्या शाळेजवळच्याच पडताळीणी केंद्रावर जाऊन पडताळणी करावी , तसेच अर्जात नमूद केलेल्या कागद पत्रांच्या साक्षांकित आणि मूळ प्रती घेऊन पडताळणीसाठी उपस्थित राहावे, सर्व कागदपत्रांच्या दोन प्रति तयार कराव्यात, त्यापैकी एक संच पडताळणी समितीककडे व दुसरा संच शाळेत सादर करावा  यातील सर्व कागदपत्र पडताळणी समितीकडून तपासून घ्यावीत, तसेच आपला आॅनलाईन प्रवेशा झाल्याची पावती तथा अलॉटमेंट लेटर आणि प्रवेशाची कागदपत्र घेऊन दिलेल्या मूदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा असे आवाहनही शिक्षण विभागाने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे. 

मागील वर्षाच्या तुलनेत जागांमध्ये घट 
नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी ४६६ शाळांमध्ये ६ हजार ५८९ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ११ हजार ११८ अर्ज आले होते. एकूण चार प्रवेश फेºयांमध्ये ७ हजार १०८ बालकांची लॉटरी लागली. मात्र, त्यापैकी केवळ ४ हजार ६४६ विद्यार्थ्यांचाच प्रवेश होऊ शकला होता. जिल्ह्यातील ९ शाळांना २० टक्के अनुदान मिळाल्याने त्यांना आरटीई प्रवेशप्रक्रियेतून वगळण्यात आले असून, जागांची संख्या ५ हजार ७६४ वर आली आहे. त्यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्हाभरात ८२५ जागा कमी झाल्या असून, उपलब्ध जागांसाठी आरटीईच्या प्रवेशप्रक्रियेत तीनच टप्प्यात लॉटरी काढली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.  

Web Title: RTE dropping from Pune; Sms to get parents on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.