आरटीओ कार्यालयाच्या आवारात एजंटांची दुकाने
By admin | Published: March 3, 2017 01:40 AM2017-03-03T01:40:32+5:302017-03-03T01:40:55+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात एजंटांची दुकाने सर्रास सुरू आहेत. आरटीओ कार्यालयाच्या जागेवर डाक्टरपासून पेंटरपर्यंत सर्वांचीच दुकानदारी सुरू आहे
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात नजर टाकल्यास येथील व्यवसायाची कल्पना येते. या ठिकाणी एजंटांची दुकाने सर्रास सुरू आहेत. आरटीओ कार्यालयाच्या जागेवर डाक्टरपासून पेंटरपर्यंत सर्वांचीच दुकानदारी सुरू आहे. जणू या व्यावसायिकांच्या भरवशावरच आरटीओचा कारभार सुरू असावा इतके सलोख्याचे संबंध निर्माण झाले आहेत. आरटीओ कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर वाहन आणि परवान्यासाठी लागणाऱ्या सर्वप्रकारच्या सुविधा मिळवून देण्याची जबाबदारी एजंटच पार पाडतात. यासाठी त्यांना आतील सेटिंग कामी येते. अगदी खुलेआम बसून आणि चारचाकी वाहनांमधून अर्ज वितरणापासून ते अर्ज आॅनलाइन करण्यापर्यंतची दुकाने सुरू आहेत. सदरील बाब येथील सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे. मात्र एजंटमुक्त आरटीओ कार्यालय व्हावे, असे येथील यंत्रणेलादेखील वाटत नसावे असेच वातावरण येथे दिसून आले.