आरटीओ अधिकाºयाचे संकेतस्थळ अकाउंट हॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:08 AM2017-08-21T00:08:02+5:302017-08-21T00:17:59+5:30

प्रादेशिक परिवहन अधिकाºयांना शासकीय कामासाठी देण्यात आलेला संकेतस्थळावरील आयडी व पासवर्ड हॅक करून त्याद्वारे दोन व्यावसायिक वाहनांना विनातपासणी योग्यता प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार नाशिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात उघडकीस आला आहे़ या प्रकारामुळे एक ना अनेक कारणांमुळे नेहेमी चर्चेत असलेले आरटीओ कार्यालय पुन्हा चर्चेत आले आहे़ दरम्यान, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात आयटी अ‍ॅक्टन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

 RTO official's website account hack | आरटीओ अधिकाºयाचे संकेतस्थळ अकाउंट हॅक

आरटीओ अधिकाºयाचे संकेतस्थळ अकाउंट हॅक

Next

नाशिक : प्रादेशिक परिवहन अधिकाºयांना शासकीय कामासाठी देण्यात आलेला संकेतस्थळावरील आयडी व पासवर्ड हॅक करून त्याद्वारे दोन व्यावसायिक वाहनांना विनातपासणी योग्यता प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार नाशिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात उघडकीस आला आहे़ या प्रकारामुळे एक ना अनेक कारणांमुळे नेहेमी चर्चेत असलेले आरटीओ कार्यालय पुन्हा चर्चेत आले आहे़ दरम्यान, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात आयटी अ‍ॅक्टन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात हेमंत गोविंद हेमाडे (४९) हे व्यवसाय मोटार परिवहन निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत़ बुधवारी (दि़१६) कार्यालयात दैनंदिन काम करीत असताना काही वाहनांना स्वयंचलित वाहन निरीक्षक केंद्रावर न आणता योग्यता प्रमाणपत्र देण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले़ याबाबत त्यांनी संगणकीय प्रणालीवर या प्रमाणपत्रांची तपासणी केली असता ५ आॅगस्ट रोजी २०१७ रोजी दोन व्यावसायिक वाहनांना फिटनेस व्हेरिफिकेशन व अप्रुव्हल त्यांच्या अकाउंटवरून त्यांच्या संमतीविना कोणीतरी लॉगीन करून केल्याचे निदर्शनास आले़निरीक्षक हेमाडे यांनी तपास केला असता या दोन्ही वाहनांची तपासणी नाशिकच्या मोटार परिवहन कार्यालयात केली नसल्याचे समोर आले़ अखेर त्यांनी शनिवारी (दि़१९) सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ त्यानुसार सायबर पोलिसांनी फसवणूक तसेच आयटी अ‍ॅक्टन्वये गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता प्रादेशिक परिवहन अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही़

Web Title:  RTO official's website account hack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.