आरटीओची विशेष तपासणी मोहीम
By admin | Published: December 9, 2015 11:15 PM2015-12-09T23:15:21+5:302015-12-09T23:17:07+5:30
आरटीओची विशेष तपासणी मोहीम
नाशिक : रस्ता सुरक्षेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) गेल्या महिन्यात विशेष तपासणी मोहीम राबविली होती़ या मोहिमेचा दुसरा टप्पा १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे़
या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवार (दि़ १४) नाशिक-पेठ व नाशिक-मुंबई रस्ता, मंगळवार (दि़ १५) नाशिक-दिंडोरी व नाशिक- त्र्यंबकेश्वर रोड, बुधवारी (दि़ १६) नाशिक-धुळे व नाशिक-गंगापूर रोड, गुरु वारी(दि़ १७) नाशिक-औरंगाबाद व कॉलेजरोड तर शुक्र वारी (दि़ १८) नाशिक-पुणे रोड व उंटवाडी, सिडको रोड या रस्त्यावर वाहन तपासणी करण्यात येणार आहे. आरटीओतर्फे वाहन तपासणीच्या पहिल्या टप्प्यात हेल्मेट, सीटबेल्ट, वाहन चालवताना मोबाइलचा वापर व अतिभार वाहून नेणाऱ्या ९३६ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई तर ४५० नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले होते़