दबाव आणि हस्तक्षेपामुळेच रडतोय ‘कांदा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:13 AM2017-10-27T01:13:22+5:302017-10-27T01:13:32+5:30

अपेक्षित भाव मिळत नाही. शासनाने बाजार समित्या आणि व्यापाºयांवर अप्रत्यक्ष दबाव हटविल्यास कांद्याला आगामी काळात तीन हजारापासून ते पाच हजारापर्यंत भाव मिळू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

 Rubbing 'Onion' due to pressure and interference | दबाव आणि हस्तक्षेपामुळेच रडतोय ‘कांदा’

दबाव आणि हस्तक्षेपामुळेच रडतोय ‘कांदा’

Next

नाशिक : उन्हाळ कांद्याचे घटत चाललेले आयुष्यमान आणि शासनाचा अप्रत्यक्ष असलेला दबाव यामुळे कांद्याला अपेक्षित भाव मिळत नाही. शासनाने बाजार समित्या आणि व्यापाºयांवर अप्रत्यक्ष दबाव हटविल्यास कांद्याला आगामी काळात तीन हजारापासून ते पाच हजारापर्यंत भाव मिळू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
आजमितीस जिल्ह्णातील १६ कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि उपबाजार मिळून सरासरी दीड लाख क्विंटलच्या आसपास कांद्याची आवक असते. लासलगाव बाजार समितीचा विचार केला तर गुरुवारी (दि.२६) दिवसभरात लासलगाव बाजार समितीत ११ हजार क्ंिवटल तर निफाड व विंचूर उपबाजार समित्या मिळून सुमारे १५ हजार क्ंिवटल कांद्याची दिवसभरात आवक झाली. कांद्याला कमाल सरासरी २६०० रुपये भाव मिळाला. सद्यस्थितीत बाजार समित्यांमध्ये ८० टक्के उन्हाळ कांद्याची व २० टक्के पोळ कांद्याची आवक झाली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने व्यापाºयांकडे तसेच बाजार समित्यांकडे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कांद्याच्या साठवणुकीबाबत आवश्यक त्या कागदपत्रांबाबत शासन विचारणा करीत असल्याने व्यापारीवर्ग धास्तावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बाजार समित्यांमध्ये शासनाने हस्तक्षेप न केल्यास कांद्याला चांगला भाव मिळू शकतो. बुधवारी कांद्याला भाव न मिळाल्याने कसमा भागात शेतकºयांनी रास्तारोको केला. साधारण: ता आॅक्टोबर ते डिसेंबर या काळात कांद्याला ३००० हजारापासून पाच हजारापर्यंत भाव मिळत असल्याचे मागील काही वर्षांतील उदाहरणे आहेत. मात्र गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून सातत्याने कांद्याबाबत शासनाच्या असलेल्या अप्रत्यक्ष दबावामुळे कांद्याला भाव मिळत नसल्याचे सूत्रांचे खासगीत म्हणणे आहे. कांद्याचे भाव आजपर्यंत चार ते पाच हजारापर्यंत जाणे अपेक्षित होते. मात्र शासनाच्या अप्रत्यक्ष दबावामुळेच कांद्याला भाव मिळत नाही. कांद्याचे सलग नऊ-दहा महिने भाव कोेसळले तेव्हा सरकार पातळीवरून कोेणतीही हालचाल झाली नाही. मात्र शेतकºयांना दोन पैसे मिळू लागताच शासनाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हस्तक्षेप करून कांद्याचे भाव मर्यादेत ठेवले आहेत.

Web Title:  Rubbing 'Onion' due to pressure and interference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.