रुबेला लसीकरण जनजागृती मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 06:20 PM2018-10-26T18:20:24+5:302018-10-26T18:20:50+5:30
लोहोणेर येथील जनता विद्यालयात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम जनजागृती मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
लोहोणेर : येथील जनता विद्यालयात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम जनजागृती मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. अध्यक्षस्थान पालक संघाचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र शेवाळे यांनी भूषविले. व्यासपीठावर प्राचार्य आर. एच. भदाणे, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष रूपाली धामणे, पंडित पाठक उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे विज्ञानशिक्षक विनीत पवार व आर. जे. थोरात यांनी गोवर व रुबेला या आजाराविषयी सविस्तर माहिती दिली. या आजाराविषयी अधिक माहिती देताना पवार यांनी सांगितले की, येत्या नोव्हेंबर महिन्यात आरोग्य विभागाच्या वतीने गोवर व
रुबेला आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. याअंतर्गत ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी ज्या बालकांना गोवर व रुबेला ही लस दिली आहे अशांनाही अतिरिक्त डोस द्यायचा आहे. शाळांमध्ये पहिल्या दोन ते तीन आठवड्यात ही लस दिली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पालकांच्या विविध समस्यांचे निराकरण मुख्याध्यापक भदाणे यांनी केले. त्यानंतर सर्व पालकांनी कलादालन, डिजिटल क्लासरूमला भेट दिली व समाधान व्यक्त केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन आर. जे. थोरात यांनी केले.