नाशिक महापालिकेत राडा, राजदंड पळवण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 02:06 PM2018-04-09T14:06:26+5:302018-04-09T14:27:24+5:30
नाशिक महापालिकेच्या महासभेत आज अभूतपूर्व गोंधळ झाला.
नाशिक - नाशिक महापालिकेच्या महासभेत आज अभूतपूर्व गोंधळ झाला. एकाच प्रभागात वीस-वीस ग्रीन जिम मंजूर करून इतिवृत्तात घुसविण्यात आल्याचा आरोप करत महिला आणि बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी महापौरांना जाब विचारला आणि महापौर पीठासनासमोर जमून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
त्याला भाजपाने प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केल्यानंतर गोंधळ अधिकच वाढला. त्यातच महापौरांनी नव्या महिला आणि बाल कल्याण समिती सदस्यांची नावे घोषित करण्यास सुरुवात केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी पीठासणावर जाऊन राजदंड खेचण्यास सुरुवात केली.
त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सहभागी झाले होते. या गोंधळात महापौर रंजना भानसी यांनी राष्ट्रगीत सुरू करून कामकाज संपवले. आजच्या महासभेत शहरात घरपट्टी वाढीला मंजुरी देण्याचा विषय इतिवृत्तात होता तो टाळण्यासाठी पूर्व नियोजित गोंधळ घालण्यात आल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.