नाशिकमध्ये ऐन उन्हाळ्यात बहरलंय रुद्राक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 12:19 PM2018-04-25T12:19:40+5:302018-04-25T12:19:40+5:30
नाशिकमधील अभियंता अविनाश शिरोडे यांनी नेपाळमधून सुमारे 22 वर्षांपूर्वी आणून लावलेले रुद्राक्षाचं झाड चांगलंच बहरलंय.
नाशिक - रुद्राक्ष हे शिवभक्तांचे खास आकर्षण आणि श्रद्धेचा भाग. सामान्यतः हिमालयाच्या कुशीत रुद्राक्षाची झाडे बहरतात. पण नाशिकमध्ये देखील गेल्या अनेक वर्षांपासून रुद्राक्षाची झाडे फुलत आहेत. नाशिकमधील अभियंता अविनाश शिरोडे यांनी नेपाळमधून सुमारे 22 वर्षांपूर्वी आणून लावलेले रुद्राक्षाचं झाड चांगलंच बहरलंय. दरवर्षी हे झाड रुद्राक्षांनी बहरतं. शिरोडे हे अनेकांना भेट म्हणून देतात.
यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे हिमालयात या झाडांना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात फुले येतात. पण नाशिकमधील रुद्राक्षाच्या झाड मात्र आता एप्रिल महिन्यात फुलांनी बहरलंय. रुद्राक्षाची आवड असणारे अनेक नागरिक पंचवटीतील रहिवासी असलेल्या शिरोडे यांच्या निवासस्थानी भेट देतात आणि शिरोडेही त्यांनी या वृक्षाची शास्त्रीय माहिती देतात.