शहरात कोरोनाचा कहर, जंगलात रानमेव्याला बहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 06:31 PM2021-03-18T18:31:10+5:302021-03-18T18:31:37+5:30

त्र्यंबकेश्वर : मार्च-एप्रिल मध्ये वेध लागतात ते त्र्यंबकेश्वरच्या पश्चिम पट्ट्यातील जंगलसंपदा असलेल्या रानमेव्याचे ! जंगलातील करवंदापासून ते जांभळापर्यंत असा रानमेवा आता त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेत दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. मागील वर्षी लॉक डाऊनमध्ये या जंगलच्या रानमेव्याला आलेला बहर झाडावरच कोमेजला होता. आताही कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता हा रानमेवा बाजारात येईल की नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.

The ruins of the corona in the city, the beans in the forest | शहरात कोरोनाचा कहर, जंगलात रानमेव्याला बहर

शहरात कोरोनाचा कहर, जंगलात रानमेव्याला बहर

Next
ठळक मुद्देबाजारात रानमेव्याची प्रतीक्षा : गतवर्षी लॉकडाऊनचा फटका

वसंत तिवडे,

त्र्यंबकेश्वर : मार्च-एप्रिल मध्ये वेध लागतात ते त्र्यंबकेश्वरच्या पश्चिम पट्ट्यातील जंगलसंपदा असलेल्या रानमेव्याचे ! जंगलातील करवंदापासून ते जांभळापर्यंत असा रानमेवा आता त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेत दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. मागील वर्षी लॉक डाऊनमध्ये या जंगलच्या रानमेव्याला आलेला बहर झाडावरच कोमेजला होता. आताही कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता हा रानमेवा बाजारात येईल की नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.

या रानमेव्यामध्ये आकर्षण असते ते जंगलची काळी मैना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवंदाचे.
या करवंदांना कुणी जंगली द्राक्षेही म्हणतात. याबरोबरच हिरव्याकंच कैऱ्या, गावठी आवळे, बकुळी, तोरणे, काळी पिकलेली जांभळे, जंगली चिकू असा एक ना अनेक रानमेवा मार्च ते जूनपर्यंत बाजारात दाखल होत असतो. यामध्ये हिरवी करवंदे आंबट चवीची असतात. या करवंदांचे लोणचे बनवतात. या लोणच्याला शहरात हॉटेलमध्ये चांगली मागणी असते. काही लोक या हिरव्या करवंदाची भाजी देखील करतात. हिरव्या कैऱ्यांचा ठेचा तर जेवणाची रंगत वाढवतो. आवळापासून तर अनेक पदार्थ बनवतात. जांभुळ हे फळ आयुर्वेदिक असल्याने ते मधुमेहींसाठी उपयुक्त असते. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे या रानमेव्याची तोडच झालेली नव्हती. आताही कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे रानमेव्याला पुन्हा एकदा कोरोनाचा अडसर ठरतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

आंब्याचे दर वधारणार
सध्या आंब्याला मोठ्या प्रमाणात बहर आला असून आंब्याची झाडे मोहोराने लगडली आहेत. त्यातून चिमुकल्या डोकावणाऱ्या हिरव्याकंच कैऱ्या लक्ष वेधून घेत आहेत. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आंब्याच्या मोहरालाही बसला होता. परंतु, यंदा आंब्याचे उत्पादन बऱ्यापैकी असले तरी दर वधारणार असल्याचे सांगितले जात आहे.
फोटो- १८ करवंदे

Web Title: The ruins of the corona in the city, the beans in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.