माळी समाजाला राज्यकर्त्यांनी डावलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:57 AM2018-04-24T00:57:25+5:302018-04-24T00:57:25+5:30
देशभरात उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, महाराष्ट्र, राजस्थान, जम्मू-कश्मीर अशा विविध भागांत माळी समाज बहुसंख्येने असून, देशांत १४ ते १५टक्के लोकसंख्या माळी समाजाची आहे.
नाशिक : देशभरात उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, महाराष्ट्र, राजस्थान, जम्मू-कश्मीर अशा विविध भागांत माळी समाज बहुसंख्येने असून, देशांत १४ ते १५टक्के लोकसंख्या माळी समाजाची आहे. शिवाय ओ.बी.सी. घटकातील मोठा समाज म्हणूनदेखील माळी समाजाची असल्याने देशाच्या राजकारणात माळी समाजाची भूमिका महत्त्वाची असतानाही माळी समाजाला राज्यकर्त्यांकडून डावलले जात असल्याचा सूर माळी समाजाच्या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. माळी समाजाच्या प्रमुख पदाधिकाºयांची बैठक ओझर येथे रविवारी घेण्यात आली. या बैठकीला अखिल भारतीय सैनी सेवा संघ राष्ट्रीय महासचिव वनिता लोंढे, माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत, अखिल भारतीय सैनी सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप नाईक, राजस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष कैलास सैनी, छगनलाल परिहार (माळी), ओझरचे दिलीप मंडलिक, मनरूप कच्छवा, सुनील टिळेकर, अरुंधती डोमाळे, रमेश रासकर, रमेश मंडलिक, एच.ए.एल. कर्मचारी संघटनेचे अनिल मंडलिक, गणेश नन्नावरे, शंतनू शिंदे, सचिन दप्तरे, पी. एम. सैनी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना विजय राऊत यांनी भाजपाने २०१४च्या निवडणुकीत मोदी ओ.बी.सी. असल्याचा प्रचार करून सत्ता काबीज केली. पण ओ.बी.सी. समाजाच्या मागण्यांचा कोणताही विचार केला नाही. उलट ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांना तुरुंगात डांबले आहे. उत्तर प्रदेशमध्ये केशव प्रसाद मौर्य यांचा चेहरा समोर करून मते मिळवली, पण मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांना पुढे केले. महाराष्ट्रमध्ये सोशल इंजिनियरिंग करताना माळी समाजाला मंत्रिपद दिले नाही, त्यामुळे येणाºया निवडणुकांमध्ये याची किंमत मोजावी लागणार आहे. संदीप नाईक यांनी, राजस्थानमध्ये सैनी, उत्तर प्रदेशमध्ये मौर्य, बिहारमध्ये कुशवाह, दक्षिण भारतात रेड्डी अशा विविध आडनावे असलेले माळी देशभरात आहेत, पण आपल्याला ते माहीत नाही. त्यामुळे देशभरात सर्वांनी आपल्या आडनावापुढे माळी लावण्याची सूचना केली. बैठकीचे आयोजन व सूत्रसंचालन अखिल भारतीय सैनी सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव पी. एम. सैनी यांनी केले.