जो नियम पाळतो तोच ‘डॉन’वाहतूक
By admin | Published: October 18, 2016 03:01 AM2016-10-18T03:01:49+5:302016-10-18T03:16:39+5:30
जो नियम पाळतो तोच ‘डॉन’वाहतूक
नाशिक : डॉन को पकडना मुश्कील ही नहीं, नामुमकीन हैं, क्योकी....’ ‘डॉन’ अर्थात दोस्त आॅफ नासिक. महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये मानसिक बदल घडून यावा आणि भावी पिढी ही सुरक्षित व शिस्तप्रिय वाहतूक करणारी असावी, या उद्देशाने नाशिक फर्स्ट व शहर पोलिसांकडून ‘मै हुँ डॉन’ ही चळवळ तरुणाई पुढे नेणार असल्याची घोषणा शुभारंभ सोहळ्यात करण्यात आली. ‘डॉन नाशकात’, ‘कौन हैं डॉन’, ‘डॉन को पकडना मुश्कील ही नहीं....’ अशा प्रकारचे लघुसंदेश आणि रहस्यमय चित्राच्या ‘पोस्ट’ पंधरवड्यापासून नाशिकककरांच्या व्हॉट््सअॅपवर फिरत होत्या. यामुळे तरुणाईची याविषयीची उत्सुकता प्रचंड ताणली गेली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘डॉन’ तरुणाईपर्यंत शहर वाहतूक पोलीस व नाशिक फर्स्ट ही वाहतुकीविषयी जनजागृती करणाºया संस्थेने पोहचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. या ‘डॉन’विषयीची संकल्पना सविस्तरपणे मांडण्यासाठी नाशिक फर्स्टच्या वतीने शहरातील ‘चिल्ड्रन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क’येथे शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर महापौर अशोक मुर्तडक, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपआयुक्त विजय पाटील, नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ आदिंसह ‘२४ डॉन’च्या समूहासह महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. नाशिककरांनी ‘डॉन’ व्हावे आणि शहराची वाहतूक आदर्श वाहतूक असल्याचे सिद्ध करून दाखवावे. तरुणाईने ‘डॉन’चा खरा अर्थ समजून घेत वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.