चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी महामंडळाकडून नियमावली तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 06:37 PM2020-06-12T18:37:33+5:302020-06-12T18:42:51+5:30

नाशिक : शहरास जिल्ह्यातील प्रेक्षणीय आणि पर्यटनस्थळी करण्यासाठी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी परवानगी मिळाल्यानंतर आता अर्ज पत्र यांची प्रक्रिया पूर्ण होत असतानाच अखिल भारतीय चित्रपट मंडळाने चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नियमावली तयार केली आहे.

Rules prepared by the corporation for shooting of films | चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी महामंडळाकडून नियमावली तयार

चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी महामंडळाकडून नियमावली तयार

Next
ठळक मुद्देप्रेक्षणीय, पर्यटनस्थळी चित्रीकरणासाठी परवानगीकामगार, तंत्रज्ञ, कलावंतांचा पोटापाण्याचा प्रश्न

नाशिक : शहरास जिल्ह्यातील प्रेक्षणीय आणि पर्यटनस्थळी करण्यासाठी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी परवानगी मिळाल्यानंतर आता अर्ज पत्र यांची प्रक्रिया पूर्ण होत असतानाच अखिल भारतीय चित्रपट मंडळाने चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नियमावली तयार केली आहे.
चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण बंद असल्यामुळे रोजंदारीवरील कामगार, तंत्रज्ञ, कलावंतांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय चित्रपट मंडळ, चित्रपट निर्माते, कलाकार व ब्रॉडकास्टिंग फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपटाच्या चित्रण करण्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान चित्रीकरणादरम्यान काय काळजी घेण्यात येईल, यासंदर्भात महामंडळाने काही नियम व उपाययोजना सुचवल्या होत्या. याविषयी झालेल्या संवादातून चित्रीकरण सुरू करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहेत, यासंबंधी सविस्तर नियामावली तयार करावी असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, अशी माहिती अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे प्रमुख कार्यवाहक सुशांत शेलार यांनी दिली. कोरोनासंबंधीच्या शासकीय नियमांच्या अधीन राहून चित्रपटांच्या चित्रीकरणाचे कामकाज सुरू करता येणे शक्य आहे. यात प्रामुख्याने चित्रीकरणादरम्यान लोकवस्ती बाहेरच शुटिंग सुरू करावे, कमीत कमी लोकांचे युनिट ठेवावे, चित्रीकरणाच्या वेळी नियमावलीनुसार कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारमान्य दोन सुरक्षारक्षक असावे, सर्व युनिटनी एकाच जागेवर मुक्काम करावा, चित्रीकरण होण्यापूर्वी जागेची तपासणी करण्यात यावी, सर्व लोकेशनचे निर्जंतुकरण करण्यात यावे, भोजनाची तसेच अन्य व्यवस्था याबाबत काळजी घेण्यात यावी, सर्व युनिटने हातमोजे आणि मास्कचा वापर करावा, वाहतुकीसाठी असलेले वाहन सॅनिटाइज करूनच वापरावे, नवीन ठिकाणी जाताना सर्वांचे आरोग्य तपासणी प्रमाणपत्र घेण्यात यावे, चित्रीकरण ठरलेल्या वेळेतच पूर्ण करावे, चित्रीकरण पाहण्यासाठी कोणीही गर्दी करू नये, महामंडळाच्या भरारी पथकाद्वारे यावर लक्ष ठेवण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

Web Title: Rules prepared by the corporation for shooting of films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.