सोशल मीडियाची नियमावली अनधिकृत

By admin | Published: February 11, 2017 12:24 AM2017-02-11T00:24:00+5:302017-02-11T00:24:12+5:30

गिरीश महाजन : विरोधकांनी उपद्व्याप केल्याचा आरोप

The rules of social media are unauthorized | सोशल मीडियाची नियमावली अनधिकृत

सोशल मीडियाची नियमावली अनधिकृत

Next

 नाशिक : शहरासाठी बहुचर्चित बांधकाम नियंत्रण व विकसन नियमावली मंजूर झाल्याचे सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यात शहरातील गाजलेला कपाटाचा प्रश्न सुटला नसल्याचे समोर आले असताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ही नियमावली अधिकृत नसल्याचे स्पष्ट केले. शासनाने अशाप्रकारे कोणतीही अधिकृत नियमावली प्रसिद्ध केली नसून हे विरोधकांचे कारस्थान असल्याचे सांगितले. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि बांधकाम नियमावली प्रकरणी त्यांनी कोणत्याही पक्षावर थेट आरोप करणे टाळले.
सुमारे वर्षभरापासून रखडलेला विकास आराखडा महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेत मंजूर झाला असला तरी बांधकाम विकास नियंत्रण नियमावली मात्र प्रसिद्ध झालेली नव्हती, परंतु सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या २०६ पानांच्या पोस्टमध्ये ही नियमावली देण्यात आली असून, त्यानुसार नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात चर्चेचा मुद्दा ठरलेल्या कपाटाच्या प्रश्नासह ९ मीटर रुंदीपेक्षा कमी रुंदी असेल अशा ठिकाणी टीडीआर वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा विविध नियमांमुळे नाशिकचा विकास प्रभावित होण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागल्याने अशा पोस्टचा भाजपाला महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे, परंतु या प्रकरणावर सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेली नियमावली अनधिकृत असून, हा विरोधी पक्षांचाच खोडसाळपणा असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. तसेच महापालिके च्या निवडणुकीत विरोधी पक्षांकडे प्रचाराचा मुद्दाच उरला नसून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच अशाप्रकारचे उपद््व्याप सुरू असल्याची टीका पालकमंत्र्यांनी केली. दरम्यान, याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The rules of social media are unauthorized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.