प्रभाग समित्यांवर सत्ताधारी सेना - काँग्रेसचे वर्चस्व कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:51+5:302021-07-15T04:11:51+5:30

बुधवारी महापालिकेच्या चारही प्रभाग समिती सभापतींची निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, नगरसचिव शाम ...

Ruling Sena-Congress dominates ward committees | प्रभाग समित्यांवर सत्ताधारी सेना - काँग्रेसचे वर्चस्व कायम

प्रभाग समित्यांवर सत्ताधारी सेना - काँग्रेसचे वर्चस्व कायम

Next

बुधवारी महापालिकेच्या चारही प्रभाग समिती सभापतींची निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, नगरसचिव शाम बुरकुल यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने निवड प्रक्रिया घेण्यात आली. प्रभाग १ साठी सकाळी ११ वाजता निवड प्रक्रियेला सुरूवात झाली. यावेळी नामांकन अर्ज दाखल केलेल्या सेनेच्या कल्पना विनोद वाघ व भाजपाचे नगरसेवक भरत बागुल यांना माघार घेण्यासाठी मुदत देण्यात आली. विहित मुदतीत भाजपाचे बागुल यांनी माघार घेतल्याने सेनेच्या नगरसेविका वाघ यांची बिनविरोध निवड झाली. तर प्रभाग क्र. २ मध्ये काँग्रेसच्या रजियाबी शेख इस्माईल यांना १४ मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या. तर महागठबंधन आघाडीचे सय्यद शबानाबानो सय्यद अकील यांना केवळ ५ मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. प्रभाग ३ मध्ये काँग्रेसचे अब्दुल अजीज अब्दुल सत्तार यांना १२ मते मिळाल्याने ते विजयी झाले. तर महागठबंधन आघाडीचे नगरसेवक अन्सारी मो. साजीद मो. रशीद यांना ११ मते मिळाली. त्यांच्या पक्षाच्या जैबुन्नीसा समसुद्दोहा गैरहजर राहिल्याने अब्दुल अजीज यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला तर प्रभाग ४ मध्ये महागठबंधन आघाडीचे अन्सारी अय्याज मोहंमद सुलतान यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची निवड निश्चित होती. बुधवारी केवळ त्यांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण करुन बिनविरोध निवड झाली. सभापती पदांच्या निवडीनंतर समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला. प्रभाग १ च्या सभापतीपदी सेनेच्या कल्पना वाघ यांची निवड झाल्यानंतर कृषी मंत्री दादा भुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला तर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

फोटो फाईल नेम : १४ एमजेयुएल ०२ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्र. १ च्या सभापतीपदी सेनेच्या कल्पना वाघ यांची निवड झाल्यानंतर कृषी मंत्री दादा भुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात विजयोत्सव साजरा करताना उपमहापौर निलेश आहेर, सेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रमोद शुक्ला, युवा नेते अजिंक्य भुसे, स्थायी समितीचे सभापती राजाराम जाधव, मनोहर बच्छाव, विनोद वाघ, सखाराम घोडके, राजेश गंगावणे, जे. पी. बच्छाव आदींसह नगरसेवक.

फोटो फाईल नेम : १४ एमजेयुएल ०३ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव मनपाच्या प्रभाग समिती सभापती निवड प्रक्रिया राबविताना मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी. समवेत नगरसचिव शाम बुरकुल आदी.

140721\14nsk_26_14072021_13.jpg~140721\14nsk_27_14072021_13.jpg

फाेटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.~फाेटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.

Web Title: Ruling Sena-Congress dominates ward committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.