‘कलापुष्प’मध्ये रमले चिमुकले कलाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:29 AM2018-02-26T00:29:45+5:302018-02-26T00:29:45+5:30
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर व आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘कलापुष्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मनमाड : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर व आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘कलापुष्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मविप्रचे तालुका संचालक दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजºया करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार जगन्नाथ धात्रक, शिक्षण मंडळ केंद्र समन्वयक सूर्यभान नाईकवाडे, प्राचार्य एस.एन. तावडे हे व्यासपीठावर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक पंकज गांगुर्डे यांनी प्रास्ताविकामधून शाळेच्या कार्याचा आढावा सादर केला. आजचे विद्यार्थी हे देशाचे भावी नागरिक असून, सुसंस्कारित पिढी निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच कलागुणांना वाव मिळणे आवश्यक असल्याचे मत दिलीप पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. हरिपाठ, दिंडी, देवीचा गोंधळ, खंडोबाची जेजुरी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केल्या. मोबाइलच्या अति वापराबाबत जनजागृती करणारे नाट्य साकारण्यात आले. शाळेत वर्षभरात होणारे विविध उपक्रम, साजरे करण्यात येणारे सण-समारंभ याबाबत चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शीतल अहेर, रुपाली शेलार, सचिन पवार, दिवटे, चोळके यांच्यासह अन्य शिक्षकांनी परिश्रम घेतले. पूनम मढे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता भामरे व ज्ञानेश्वर पगार यांनी केले.
नगराध्यक्षांनाही झाला गीतगायनाचा मोह......
मनमाड येथील अभिनव बाल विकास मंदिर शाळेच्या चिमुकल्यांचा कलापुष्पमधील उत्साह पाहून स्रेहसंमेलनाच्या उद्घाटक नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांनाही गीतगायनाचा मोह आवरता आला नाही. त्यांनी ‘गरजा महाराष्टÑ माझा’ यासह तीन गीते गाऊन विद्यार्थ्यांची मने जिंकली. यामुळे बालकलाकारांचा उत्साह द्विगुणित झाला असल्याचे मुख्याध्यापक पंकज गांगुर्डे यांनी सांगितले.