रम्मी-जिम्मी यांचा नवरात्रोत्सव कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 01:37 AM2021-10-08T01:37:00+5:302021-10-08T01:37:24+5:30

आठ महिन्यांपूर्वी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदवली येथे एका वृद्ध भूधारकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या गुन्ह्यामागे भूमाफियांच्या टोळीचा हात असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. तेव्हापासून टोळीप्रमुख रम्मी परमजीतसिंग राजपूत, जिम्मी परमजीतसिंग राजपूत हे दोघेही संशयित आरोपी फरार झाले होते. गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने त्यांना अटक करून गुरुवारी (दि. ७) न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने पुढील गुरुवारपर्यंत (दि. १४) दोघांना पेालीस कोठडी सुनावली.

Rummy-Jimmy's Navratri festival in jail | रम्मी-जिम्मी यांचा नवरात्रोत्सव कारागृहात

रम्मी-जिम्मी यांचा नवरात्रोत्सव कारागृहात

googlenewsNext
ठळक मुद्देआनंदवली वृद्ध खून प्रकरण : राजपूत यांना सात दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक : आठ महिन्यांपूर्वी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदवली येथे एका वृद्ध भूधारकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या गुन्ह्यामागे भूमाफियांच्या टोळीचा हात असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. तेव्हापासून टोळीप्रमुख रम्मी परमजीतसिंग राजपूत, जिम्मी परमजीतसिंग राजपूत हे दोघेही संशयित आरोपी फरार झाले होते. गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने त्यांना अटक करून गुरुवारी (दि. ७) न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने पुढील गुरुवारपर्यंत (दि. १४) दोघांना पेालीस कोठडी सुनावली. जागेच्य व्यवहारातून भूमाफियांच्या टोळीने नियोजनबद्ध पद्धतीने संघटितपणे कट रचून भूधारक रमेश मंडलिक (७०) यांचा काटा फेब्रुवारी महिन्यात काढला होता. यासाठी एका होमगार्डला सुपारी देण्यात आली होती. या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत १४ संशयित आरोपींना गजाआड केले आहे. टोळीप्रमुख रम्मी-जिम्मी हे दोघेही बंधू नाशिक शहरातून नव्हे, तर राज्यातून अन्य राज्यांत पसार झाले होते. तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर होते; मात्र वायफायद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहत सातत्याने कधी पंजाब, तर कधी हरयाणा आणि नंतर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत ठावठिकाणे बदलणाऱ्या या दोघा संशयितांच्या मुसक्या गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमधून आवळल्या. टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या गळाला लागल्याने भूमाफियांना जबर हादरा बसला आहे. खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी वैयक्तिक लक्ष घालत पर्दाफाश केला होता. त्यांच्याविरुद्ध मोक्कान्वये कारवाई केली आहे. जिल्हा सत्र न्यायालयात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. सुधीर कोतवाल यांनी युक्तिवाद केला. उच्च न्यायालयासह अपर पोलीस महासंचालकांकडूनही मोक्काच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले गेले आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ हे करीत आहेत.

--इन्फो--

आठवडाभर पथक पंजाब, हिमाचलमध्ये

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळालेल्या ‘लोकेशन’च्या दिशेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक दिनेश खैरनार, विष्णू उगले, जाकीर शेख, अंमलदार येवाजी महाले, प्रशांत मरकड, महेश साळुंके, नीलेश पवार यांच्या पथकाने मार्गस्थ होत पंजाब गाठले. चंदिगड, अमृतसरमध्ये आठवडाभर तळ ठोकून तेथे शोध घेतला. तसेच तेथून हरयाणाच्या काही शहरांमध्ये रम्मी-जिम्मीचा शोध घेण्याचा प्रयत्न पथकाने केला, मात्र दोघांनी पलायन करत उत्तराखंड, हिमाचल प्रदेश गाठल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने पथकाने त्या दिशेने कूच केली. सर्वप्रथम जिम्मी यास उत्तराखंडच्या रामनगरमधून ताब्यात घेतल्यानंतर हिमाचलमधून रम्मीच्या मुसक्या आवळल्या.

Web Title: Rummy-Jimmy's Navratri festival in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.