अफवा पसरविणारे टिकटॉक भोवले; चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:04 AM2020-04-03T00:04:09+5:302020-04-03T00:04:25+5:30
जिल्ह्यातील चौघांनी कोरोनाविषयी अफवा पसरवणारी टिक-टॉक व्हिडीओ क्लीप व्हायरल केल्याचे समजताच ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत त्यांना अटक केली आहे. त्यांच्याविरु द्ध अफवा पसरवणे, साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिक : जिल्ह्यातील चौघांनी कोरोनाविषयी अफवा पसरवणारी टिक-टॉक व्हिडीओ क्लीप व्हायरल केल्याचे समजताच ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत त्यांना अटक केली आहे. त्यांच्याविरु द्ध अफवा पसरवणे, साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोनासंदर्भात सोशल मिडियावर अफवा पसरविणारा कोणत्याही प्रकारचा व्हिडीओ, आॅडीओ अथवा लघुसंदेश पोस्ट करणे कायदेशीर गुन्हा असल्याचे पोलीस प्रशासनाने जाहीर केले आहे. तरी जिल्ह्यात सोशल मिडियावर कोरोनाविषयी अफवा पसरवणारे व्हिडीओ व्हायरल होत असल्याची बाब पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांना संबंधितांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. पोलिसांनी त्यांचे सोशल मीडियावर असलेले खाते तपासून त्यांचा माग काढला असता एकाने चलनी नोटेचा वापर करीत कोरोनाबाबत आक्षेपार्ह भाष्य केल्याचे टिक-टॉक व्हिडीओत आढळून आले. त्यामुळे संबंधितासह तीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे़
यापैकी तीन संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्या चौथ्या साथीदाराला शुक्रवारी न्यायालयात आणले जाणार आहे.